शिक्षिकेच्या फोटोसह पोस्ट टाकत म्हणाली, ‘बोअरींग क्लास’! शिक्षिका भडकली आणि…
घटना एका सरकारी शाळेतील, शिक्षिका सोशल मीडियात आपल्या फोटोसह विद्यार्थीनीने केलेली पोस्ट पाहून संतापली
तेलंगणा : एका शिक्षिकेच्या तासिकेला कंटाळलेल्या विद्यार्थीनीने तिचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. शिवाय त्या फोटोला शेअर कराताना ‘बोअरींग क्लास’ असं कॅप्शन दिलं. चकीत करणारी बाब म्हणजे अशी काही पोस्ट केली गेली आहे, हे जेव्हा शिक्षिकेच्या निदर्शनास आलं, तेव्हा शिक्षिका संतापली. तिने पोस्ट करणाऱ्या विद्यार्थीनीला विचारणा केली. विद्यार्थीनीने कबुली दिल्यावर शिक्षिकेची माफीही मागितली. पण प्रकरण यावरच थांबलं नाही. शिक्षिकेनं सोशल मीडियात बोअरींग क्लास अशी पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थीनीला छडीने बदडून काढलं.
ही घटना तेलंगणा येथील कामारेड्डी जिल्ह्यात घडली. एका सरकारी शाळेत हा प्रकार घडला. या घटनेप्रकरणी आता विद्यार्थीनीने पोलिसात दाद मागितली आहे. पोलिसांनीही विद्यार्थीनीची तक्रार नोंदवून घेतली असून पुढे काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचंय
मदनूर मंडल संस्थानातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थीनीने गेल्या आठवड्यात एक लेक्चर अडेंड केलं. हे लेक्चर काही विद्यार्थीनीना फारसं भावलं नाही. तिला ते कंटाळवाणं वाटलं.
सदर विद्यार्थीनीने आपल्या मोबाईलमध्ये शिक्षिकेचा शिकवतानाचा फोटो काढला आणि नंतर सोशल मीडियात बोअरींग क्लास असं लिहून तो अपलोडही केला.
ही बाब शिक्षिकेला कळताच तिला राग आला. शिक्षिकेला सदर प्रकाराबाबत विद्यार्थीनाला जाब विचारला. विद्यार्थीनीने आपली चूक कबूल केली. शिक्षिकेची माफी मागितली. पण त्यानंतर शिक्षिकेने या विद्यार्थीनीला आणि तिच्यासोबत असणाऱ्या तिच्या मैत्रिणींनाही छडीने धडा शिकवण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थीनींना केली जाणारी मारहाणीचा प्रकार दुसऱ्या एका विद्यार्थ्यांनी मोबालईमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडीओ घेऊन विद्यार्थीनी पोलीस स्थानकात पोहोचल्या. त्यांनी सदर प्रकरणी शिक्षिकेविरोधात तक्रार दिली असून आता पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई केली जातेय. या घटनेचा निषेध म्हणून काही विद्यार्थ्यांकडून विरोध प्रदर्शनही करण्यात आलं होतं.