Kolkata rape murder case : ‘बलात्कार, हत्या होते, तेव्हा…’, 10 पॉइंटमध्ये समजून घ्या काय म्हटलय सुप्रीम कोर्टाने?

Kolkata rape murder case : सध्या संपूर्ण देशात कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात संताप आहे. डॉक्टर जागोजागी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या आहेत.

Kolkata rape murder case : 'बलात्कार, हत्या होते, तेव्हा...', 10 पॉइंटमध्ये समजून घ्या काय म्हटलय सुप्रीम कोर्टाने?
सुप्रीम कोर्ट (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 1:07 PM

कोलकाताच्या आरजी कर हॉस्पिटलमधील ज्यूनियर महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकार आणि राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल काही महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या. सीजेआयच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. FIR नोंदवायला इतका विलंब का झाला? म्हणून कोर्टाने विचारणा केली. रुग्णालयात झालेल्या तोडफोडीवर सुद्धा कोर्टाने प्रश्न विचारले. माजी मुख्याध्यपकावर सुद्धा कठोर टिप्पणी केली. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते 10 पॉइंटमध्ये समजून घेऊया.

प्रत्येकवेळी बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशाचा अंतरात्मा जागृत होतो, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलय.

ही केवळ भयानक घटना नाहीय. संपूर्ण भारतात डॉक्टरांच्या सुरक्षिततेसंदर्भात किती कमतरता आहेत ते दिसून येतं. आम्ही रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल चिंतित आहोत, असं CJI ने म्हटलं आहे.

महिला कामावर जाऊ शकत नसतील, त्या सुरक्षित नसतील, तर त्यांना आम्ही समानतेपासून वंचित ठेवत आहोत असं कोर्टाने म्हटलय.

पीडितेची ओळख समजली, त्या बद्दल कोर्टाने चिंता व्यक्त केली.

प्रिंसिपलने या प्रकरणाला आत्महत्या बनवण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांना मृतदेह पाहू दिला नाही असं सीजेआयने म्हटलं आहे.

CJI ने पश्चिम बंगाल सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनाला फटकारलं. एफआयआर उशिराने का नोंदवला? असा प्रश्न विचारला.

रुग्णालयात झालेल्या तोडफोडीवर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी घटना स्थळाची सुरक्षा केली पाहिजे. तिथे 7 हजार लोक कसे पोहोचले.

आरोपी फक्त हत्यारा नाही, विकृत आहे. आंदोलन कठोरतेने हाताळल्याबद्दल पश्चिम बंगाल सरकारला फटकारलं. शांततापूर्ण प्रदर्शन रोखता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं.

सु्प्रीम कोर्टाने आरजी करच्या माजी प्रिंसिपलच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. प्रिंसिपल काय करत होता? त्याला इतक्या उशिराने चौकशीसाठी का बोलावलं? असं सुप्रीम कोर्टाने म्हटलय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.