पत्नीची चिता जळालेली, राखेत नवऱ्याला दिसली अशी एक गोष्ट, थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि….
स्मशानभूमीत महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिता जळाल्यानंतर राखेत अशी एक गोष्ट दिसली, ज्यामुळे तिथे हजर असणारे सगळेच हडबडले. नवऱ्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं. राठौरा खुर्द गावातील हे प्रकरण आहे.
एक गर्भवती महिलेची प्रसुतीची वेळ जवळ आली होती. अचानक तिची तब्येत बिघडली. तिचं लगेच ऑपरेशन करावं लागलं. काही वेळाने डॉक्टरांनी महिलेच्या नातेवाईकांना एक वाईट बातमी सांगितली. आम्ही महिलेला वाचवू शकलो नाही. तिच्यासोबत बाळाचाही मृत्यू झाला. हे ऐकताच तिथे उपस्थित नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. शोकमग्न वातावरणात नातेवाईकांनी रुग्णालयातील औपचारिकता पूर्ण केल्या व महिलेचा मृतदेह घरी घेऊन आले. स्मशानभूमीत महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिता जळाल्यानंतर राखेत अशी एक गोष्ट दिसली, ज्यामुळे तिथे हजर असणारे सगळेच हडबडले.
हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या हस्तिनापूर येथील राठौरा खुर्द गावच आहे. मेरठच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे हे सर्व घडलं. राठौरा खुर्द गावात राहणाऱ्या संदीपने पत्नी नवनीत कौरला डिलीवरीसाठी मेरठच्या कस्बा मवाना येथील जेके हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण सर्जरी दरम्यान नवनीतचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चिता जळाल्यानंतर नातेवाईक राख आणण्यासाठी पोहोचले. त्यावेळी मृत महिलेच्या नवऱ्याला तिच्या राखेमध्ये सर्जिकल ब्लेड दिसलं.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
त्याने ते सर्जिकल ब्लेड उचललं व थेट पोलीस स्टेशन गाठलं. महिलेच्या ऑपरेशन दरम्यान तिच्या पोटातच हे सर्जिकल ब्लेड राहिलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. नातेवाईकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तपास समिती नियुक्त
नातेवाईक सीएम ऑफिसमध्येही गेले होते. मेरठच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्याने या घटनेनंतर रुग्णालयाचा परवाना निलंबित केला आहे. सोबतच एक तपास समिती सुद्धा नियुक्त केली आहे. डॉक्टर अशा प्रकरे दुर्लक्ष करतील याची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती, असं नातेवाईक म्हणाले. कदाचित हे सर्व नशिबात लिहिल असेल, असं ते म्हणाले. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई होईल.