मुलगी फोन करत होती, आई फोन उचलत नव्हती, घरी जाऊन पाहिले तर…

नेहमीप्रमाणे मुलीने सकाळी उठल्यावर आईला फोन केला. मात्र आई फोन उचलत नव्हती. बराच वेळ असे झाल्याने मुलीला भीती वाटली, म्हणून ती आईला पहायला घरी आली.

मुलगी फोन करत होती, आई फोन उचलत नव्हती, घरी जाऊन पाहिले तर...
डोंबिवलीत वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 4:14 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : आई फोन उचलत नाही म्हणून मुलगी घरी पहायला आली तर समोरील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आईचा राहत्या घरी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. डोंबिवली पूर्वेकडील घारीवली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. अनिता पाटील असे मयत 65 वर्षीय महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत महिलेच्या मुलीने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर महिलेच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल.

मुलगी फोन करत होती मात्र आई उचलत नव्हती

डोंबिवली पूर्वेकडील घारीवली परिसरात अर्जुन एम्पायर इमारतीत मयत महिला एकटीच राहत होती. तिला एक मुलगी असून तिचे लग्न झाल्याने ती सासरी राहते. शनिवारी सकाळी मुलगी आईला फोन करत होती. मात्र आई फोनच उचलत नव्हती. बराच वेळ फोन आईने फोन उचलला नाही म्हणून मुलगी धावत पहायला आली. मुलीने घरी येऊन बराच वेळ दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिक्रिया आली नाही.

मुलीने दरवाजा उघडून आत पाहिले तर…

मुलीने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, आत आई मृतावस्थेत पडली होती. यानंतर मानपाडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. यावेळी चोरीच्या उद्देशाने आपल्या आईची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.