बियर प्यायल्यानंतर कारमध्येच बेशुद्ध, डॉक्टरांकडून मृत घोषित, नातेवाईकांनी केला हत्येचा आरोप कारण…

हनुमान बिअर बारमध्ये पोहोचला होता. बिअर पिऊन पैसे देऊन तो बाहेर पडला. तो बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन बसला. बिअर बारच्या गार्डने सांगितले की, हनुमान बराच वेळ कारमध्ये झोपले होते.

बियर प्यायल्यानंतर कारमध्येच बेशुद्ध, डॉक्टरांकडून मृत घोषित, नातेवाईकांनी केला हत्येचा आरोप कारण...
बियर प्यायल्यानंतर कारमध्येच बेशुद्ध, डॉक्टरांकडून मृत घोषितImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 6:34 PM

जयपूर : बियर बारमध्ये बियर प्यायल्यानंतर घरी जाण्यासाठी कारमधल्या बसल्यानंतर प्रॉपर्टी व्यावसायिक (Property Businessman) अचानक बेशुद्ध झाला. त्यानंतर गंभीर अवस्थेत व्यावसायिकाला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. हनुमान सैनी असे 45 वर्षीय प्रॉपर्टी व्यावसायिकाचे नाव आहे. मयत व्यावसायिकाच्या अंगावर जखमांच्या खुणा (Injury Marks)ही आढळून आल्या आहेत.

व्यावसायिकाच्या मृत्यूनंतर मृतांच्या नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी एकच गोंधळ घातला. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कसेबले प्रकरण शांत झाले. मुरलीपुरा पोलिसांनी मेडिकल टीमकडून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी एफएसएल टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले आहेत.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

एएसआय दलचंद यांनी सांगितले की, हनुमान बिअर बारमध्ये पोहोचला होता. बिअर पिऊन पैसे देऊन तो बाहेर पडला. तो बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन बसला. बिअर बारच्या गार्डने सांगितले की, हनुमान बराच वेळ कारमध्ये झोपले होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, एकदा गार्डने त्याला पाणीही दिले होते. यानंतर हनुमानाच्या सांगण्यावरून गार्डने त्याच्या मोबाईलवरून फोन केला. गार्डने हनुमानचे घरच्यांशी बोलणे करुन दिले.

घरी फोन करुन आपल्याला न्यायला येण्यास सांगितले

एसएचओ देवेंद्र कुमार यांनी सांगितले की, मयत हनुमान सैनी हे मुरलीपुराचा रहिवासी होता. ते प्रॉपर्टीचा व्यवसाय करायचा. सीकर रोडवर असलेल्या बिअर बारसमोर उभ्या असलेल्या त्याच्या कारमध्ये ते बेशुद्धावस्थेत सापडले होते. हनुमान यांनी बिअर बारच्या रक्षकाकडून त्यांच्या घरी फोन केला होता. फोनवर त्यांनी घरच्यांना बीअर बारमध्ये येण्यास सांगितले.

यानंतर त्यांचा मुलगा तेथे पोहोचला असता, हनुमान सैनी त्यांच्या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. गंभीर अवस्थेत मुलाने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी व्यक्त केला हत्येचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी व्यावसायिक हनुमान सैनी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मुरलीपुरा पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी रुग्णालयात वैद्यकीय मंडळाकडून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यानंतर कुटुंबाने 150 हून अधिक स्थानिक लोकांसह मुरलीपुरा पोलीस ठाणे गाठले. प्रॉपर्टी व्यावसायिक हनुमान यांच्या मृत्यूवरून पोलीस ठाण्याच्या बाहेर लोकांनी गोंधळ घातला.

पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याचा पोलिसांचा आरोप

हनुमान सैनी यांच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हनुमान यांची हत्या झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याचे आश्वासन देऊन कुटुंबीयांना कसेबसे शांत केले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.