रात्री मंदिरात झोपायला गेले होते दोघे ग्रामस्थ, सकाळी थेट मृतदेहच आढळले !

शेताची राखण करण्यासाठी दोन ग्रामस्थ रात्री मंदिरात झोपले होते. पहाटे जेव्हा गावकरी मंदिरात आले तेव्हा दोघेही मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

रात्री मंदिरात झोपायला गेले होते दोघे ग्रामस्थ, सकाळी थेट मृतदेहच आढळले !
चंद्रपूरमध्ये दोन ग्रामस्थांची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 11:34 AM

चंद्रपूर / निलेश डहाट : चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मांगली गावात जगन्नाथ बाबांचे छोटे मंदिर आहे. या मंदिरात रात्री झोपायला गेलेल्या गावातील दोन व्यक्तींची अज्ञात आरोपींना हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मधुकर खुजे आणि बापूराव खारकर अशी हत्या करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.

शेतीच्या राखणसाठी मंदिरात झोपले होते

मांगली गावातील मधुकर खुजे आणि बापूराव खारकर यांची जगन्नाथ बाबा मंदिराच्या शेजारी शेती आहे. या शेतीची राखण करण्यासाठी हे दोघे ग्रामस्थ मंदिरात झोपायला जायचे. नेहमीप्रमाणे काल रात्री हे दोघे मंदिरात झोपायला गेले होते. मात्र पहाटे दोघांचेही जण रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आले. यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय

घटनेची माहिती तात्काळ भद्रावती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. यावेळी मंदिरातील दानपेटी असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपींनी हत्या नेमकी कशी केली हे अद्याप कळू शकले नाही. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

गोंदियात कौटुंबिक वादातून तरुणाला संपवले

कौटुंबिक वादातून 29 वर्षीय तरुणाला संपवल्याची धक्कादायक गोंदियातील चांदनीटोला येथे घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संदीप भाऊलाल चिखलोंडे असे मयत तरुणाचे नाव आहे. तर जितेंद्र धनलाल ठाकरे आणि विनोद नेतलाल ठाकरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.