Swati Maliwal : अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यात स्वाती मालिवाल यांना मारहाण का? नेमकं काय घडलय?
Swati Maliwal : या प्रकरणात दिल्ली पोलिसांच म्हणणं आहे की, स्वाती मालिवाल सिविल लाइन पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी घटनेबद्दल माहिती दिलीय. आम्ही तपास करत आहोत. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. पण ते सीएम हाऊसच्या आत जाऊ शकत नाहीत.
आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी खळबळजनक आरोप केल्याचा दावा दिल्ली पोलिसाशी संबंधित सूत्राने केला आहे. सीएम हाऊसच्या आतून दिल्ली पोलिसांना फोन करण्यात आला. कॉल करणाऱ्याने आपण स्वाती मालिवाल बोलत असल्याच सांगितलं, असा पोलीस सूत्राने दावा केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सोमवारी सकाळी नऊ वाजता दिल्ली पोलिसांना दोन पीसीआर कॉल करण्यात आले. मी स्वाती मालिवाल बोलतेय, असं कॉल करणाऱ्याने सांगितलं. सीएम हाऊसच्या आत मारहाण झाल्याचा कॉलवरुन त्यांनी दावा केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर त्यांनी मारहाणीचा आरोप केला.
विभवने मला मारहाण करायला लावली, असं पीसीआर कॉलवर त्यांनी सांगितलं. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. पण ते सीएम हाऊसच्या आत जाऊ शकत नाहीत. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी स्वाती तिथे नव्हती. प्रोटोकॉलनुसार, दिल्ली पोलीस सीएम हाऊसच्या आत जाऊ शकत नाहीत. पोलीस आता या पीसीआर कॉलच सत्य जाणून घेण्याच्या मागे लागले आहेत. आज तकने हे वृत्त दिलय.
डेली डायरीमध्ये काय म्हटलय?
या प्रकरणात दिल्ली पोलिसांच म्हणणं आहे की, स्वाती मालिवाल सिविल लाइन पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी घटनेबद्दल माहिती दिलीय. आम्ही तपास करत आहोत. स्वाती यांनी या संदर्भात कोणतीही लिखित तक्रार दिलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं. डेली डायरी (डीडी) एंट्रीनुसार, पहिल्या कॉलमध्ये कॉलरने म्हटलय की, “मी सीएमच्या निवासस्थानी आहे. त्यांनी पीए विभव कुमारसोबत मिळून मला वाईट पद्धतीने मारहाण केलीय”
दुसऱ्या पीसीआर कॉलमध्ये काय म्हटलेलं?
दुसऱ्या पीसीआर कॉलमध्ये करेक्शनसोबत माहिती देण्यात आली. लेडी कॉलरने म्हटलं की, “मी सीएमच्या घरी आहे. त्यांनी आपला पीए विभव कुमार मार्फत मला मारहाण केलीय” या प्रकरणात डीसीपी नॉर्थने म्हटलं की, सोमवारी सकाळी 9.34 वाजता सिविल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये पीसीआर कॉल करण्यात आला. सीएम हाऊसमध्ये मारहाण झाल्याच त्यामध्ये म्हटलं होतं.
भाजपाने काय म्हटलय?
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पीएकडून मारहाण झाल्याच्या या आरोपावर भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांच्या अटकेवर स्वाती मालिवाल शांत होत्या. त्या त्यावेळी भारतात सुद्धा नव्हत्या याकडे अमित मालवीय यांनी लक्ष वेधलं.