पेमेंट करण्याच्या बहाण्याने केबिन क्रू ला नको तिथे स्पर्श, मुंबईला येणाऱ्या विमानातील धक्कादायक घटना
Bangkok-Mumbai IndiGo flight : विमान हवेत असताना इंडिगोच्या विमानात नेमक काय घडलं? आरोपीच्या वकिलाने सांगितलं की, आरोपीला वैद्यकीय समस्या आहेत व त्याचं शरीर थरथरत होतं.
मुंबई : बँगकॉकहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. केबिन क्रू च्या सदस्यासोबत छेडछाड करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी 63 वर्षी स्वीडिश नागरिकाला अटक करण्यात आली आहे. घटनेच्यावेळी आरोपी दारुच्या नशेत होता. क्लास इरिक हाराल्ड जोनास वेस्टबर्ग असं आरोपीच नाव आहे. विमान मुंबई एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीला मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवाशांना जेवणं दिलं जात होतं. त्यावेळी आरोपीने केबिन क्रू सोबत गैरवर्तन केलं. केबिन क्रू मेंबरने विमानाच्या कॅप्टनला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वेस्टबर्गला रेड वॉर्निंग कार्ड देण्यात आलं.
त्यावेळी त्याने हद्द ओलांडली “आसन क्रमांक 28 वर बसलेला वेस्टबर्ग दारुच्या नशेत होता. मी जेव्हा त्याला सी फूड नसल्याच सांगितलं, तेव्हा त्रास सुरु झाला. मी त्याला चीकन मील दिलं व पेमेंट करण्यासाठी ATM कार्ड देण्याची मागणी केली. पीओएस मशीनवर कार्ड स्वाइप करण्याच्या बहाण्याने प्रवाशाने माझा हात पकडला. मी माझा हात सोडवला व कार्डचा पीन नंबर टाकण्यास सांगितला. त्यावेळी त्याने हद्द ओलांडली. प्रवासी उठून उभा राहिला व अन्य प्रवाशांसमोर त्याने माझ्यासोबत छेडछाड केली. जेव्हा मी आरडाओरडा केला. तेव्हा तो त्याच्या आसनाच्या दिशेने गेला” असं तक्रारदार केबिन क्रू मेंबरने सांगितलं. मदतीशिवाय माझा अशील काही पकडू शकत नाही
आरोपीच्या वकिलाने सांगितलं की, त्याला वैद्यकीय समस्या आहेत व त्याचं शरीर थरथरत होतं. “मदतीशिवाय माझा अशील काही पकडू शकत नाही. तो पीओएस कार्ड मशीन पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचा केबिन क्रू ला स्पर्श झाला. त्याने जाणीवपूर्वक स्पर्श केलेला नाही” असं आरोपीच्या वकिलाने सांगितलय