Viral Video | विद्यार्थ्याचे केस पकडून शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण, वर्गातील मुलांकडून व्हिडीओ रेकॉर्ड

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम येथील उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक सुब्रमण्यम (Subramanian) यांनी विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा मारल्याचा आरोप आहे

Viral Video | विद्यार्थ्याचे केस पकडून शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण, वर्गातील मुलांकडून व्हिडीओ रेकॉर्ड
शिक्षकाची विद्यार्थ्याला मारहाण
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 4:04 PM

Viral Video : एका सरकारी शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सना चांगलाच संताप झाला आहे. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी घडल्याची माहिती आहे. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील शासकीय नंदनार मुलांच्या उच्च माध्यमिक शाळेत हा प्रकार घडला. एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मागील वेळी वर्गात न आल्याबद्दल अमानुषपणे मारहाण केली.

काय आहे प्रकरण?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील चिदंबरम येथील उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक सुब्रमण्यम (Subramanian) यांनी विद्यार्थ्याचे केस पकडून त्याला मारहाण करत लाथा मारल्याचा आरोप आहे. चूक पुन्हा करणार नाही अशी विद्यार्थ्याने वारंवार विनवणी करुनही शिक्षक त्याला सतत लाथा मारत राहिला. याच वेळी दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलवर घटनेचे चित्रिकरण केले. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कडलोर जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओमध्ये त्रासदायक दृश्यं असू शकतात. वाचक आणि प्रेक्षकांना विवेक बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुख्याध्यापक काय म्हणाले?

द न्यूज मिनिटशी बोलताना सरकारी शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, “आठ विद्यार्थी बुधवारी शाळेत आले आणि पहिल्या तासात उपस्थित होते, पण दुसऱ्या तासात भौतिकशास्त्राच्या वर्गात उपस्थित राहिले नाहीत. सुब्रमण्यम वर्गात दररोज चाचण्या घेत असल्याने या आठ विद्यार्थ्यांनी वर्गात न जाण्याचा निर्णय घेतला. शाळेचा दौरा करताना मी या विद्यार्थ्यांना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर बसलेले पाहिले आणि त्यांना पुन्हा वर्गात नेले. मी शिक्षकांना त्यांना वर्गात बसू देण्याची विनंती केली. सुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना वर्ग सोडण्यास सांगितले आणि नंतर त्यांना मारले. एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ त्याच वर्गातील दोन मुलांनी रेकॉर्ड केला आहे.”

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | लाकडी दांडके-लोखंडी रॉड, नालासोपाऱ्यात दोन गट भिडले, तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

ना डॉक्टर ना कुठली पदवी तरीही शरीरयष्टीसाठी इंजेक्शनचा डोस, पिंपरीत चौघांना अटक

सायकल लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये वाद, 35 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.