Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : ‘फक्त मोदींची स्तुती केली म्हणून….’, टॅक्सी ड्रायव्हर अमजद खानने प्रवाशाबरोबर जे केलं ते भयानक

PM Narendra Modi : वाद झालाच, तर टॅक्सी चालकाने प्रवाशाला टॅक्सीतून उतरवण्यापर्यंत त्याला राग आलाय हे समजू शकतो. पण त्यापुढे जाऊन कोणी टोकाच पाऊल उचललं, तर त्याला काय म्हणायचं?

PM Narendra Modi : 'फक्त मोदींची स्तुती केली म्हणून....', टॅक्सी ड्रायव्हर अमजद खानने प्रवाशाबरोबर जे केलं ते भयानक
Taxi driver kills passenger for praising PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 1:14 PM

लखनऊ : टॅक्सीने प्रवास करताना अनेकदा टॅक्सी चालकाबरोबर राजकीय विषयांवर, सध्याच्या परिस्थितीवर चर्चा होते. टॅक्सी चालक बोलका असेल, तर चर्चा रंगते सुद्धा. पण टॅक्सी चालकाबरोबर सहज म्हणून झालेलं बोलणं वाद, भांडणापर्यंत जाण्याच्या घटना अपवादानेच घडतात. वाद झालाच, तर टॅक्सी चालकाने प्रवाशाला टॅक्सीतून उतरवण्यापर्यंत त्याला राग आलाय हे समजू शकतो. पण त्यापुढे जाऊन कोणी टोकाच पाऊल उचललं, तर त्याला काय म्हणायचं?

अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडलीय. मिर्झापूरमधल्या विंध्याचल पोलिसांनी या टॅक्सी चालकाला अटक केली आहे.

टॅक्सी चालकाने काय केलं?

आरोपी टॅक्सी चालकाने प्रवाशाला आपल्या SUV खाली चिरडलं. सोमवारी माहोखार गावात ही धक्कादायक घटना घडली. अमजद खान असं आरोपीच नाव आहे. त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. राजेश धार दुबे असं मृत प्रवाशाच नाव आहे.

भावाच म्हणणं काय?

राजेश यांचा भाऊ राकेश धार दुबेने तक्रारीत असं म्हटलय की, टॅक्सी प्रवासा दरम्यान माझा भाऊ राजेश आणि टॅक्सी चालक अमजद देशातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलत होते. अमजद खान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांच्यावर बोचरी टीका करत होता. त्यांना शिवीगाळ करत होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. अन्य प्रवाशांचा आक्षेप

टॅक्सीमधल्या अन्य प्रवाशांनी त्यावर आक्षेप घेतला, तेव्हा अमजदने राजेश यांना टॅक्सीतून ढकललं व आपल्या टॅक्सीखाली चिरडलं. राकेश धार दुबे यांच्या तक्रारीच्या आधारावर एफआयआर नोंदवण्यात आलं आहे, अशी माहिती मिर्झापूरचे एसपी संतोष कुमार मिश्रा यांनी दिली. हत्या 302 आणि कलम 504 अंतर्गत आरोपीला अटक केलीय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. आरोपी अमजद खानने त्याच्यावर आरोप फेटाळून लावले आहेत.

युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.