Crime | तृतीयपंथीयांचा रास्तारोको! 24 तासांत दोघां तृतीयपंथीयांच्या हत्येमुळे जाळपोळ, तोडफोड
तृतीयपंथीच्या दाव्यानुसार त्यांच्या एका साथीदाराची गोळी घालून हत्या करण्यात आली. छातीत गोळी घालून एका तृतीयपंथीचा जीव घेण्यात आल्यानंतर तृतीयपंथी समाज आक्रमक झालाय. या हत्येप्रकरणी एकाला ताब्यातही घेण्यात आलं असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
बिहार : पाटण्यात (Patana, Bihar) तृतीयपंथीयांनी रास्तारोको केलाय. गेल्या 24 तासांत दोघा तृतीयपंथीयांची हत्या (Transgender Murder) करण्यात आल्यानं इतर तृतीयपंथीयांनी एकत्र येत रास्तारोको केलाय. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका तृतीयपंथीची मंगळवारी सकाळीच गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. याप्रकरणी सखोल चौकशी करुन तातडीनं आरोपींना अटक शिक्षा केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नेमकी काय घटना?
पाटणाच्या कांकरबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हत्या झाली. सनी नावाचा एक तृतीयपंथी सकाळी जखमी अवस्थेत एका पुलाखाली पडल्याचं आढळून आलं होतं. दरम्यान, त्याला रुग्णालात नेलं जात असताना त्याचा मृत्यू झाला. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर तृतीयपंथी समाजानं आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. यावेळी करण्यात आलेल्या निदर्शानाला हिंसक वळणही लागलं होतं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.
वाद कशामुळे पेटला?
तृतीयपंथीच्या दाव्यानुसार त्यांच्या एका साथीदाराची गोळी घालून हत्या करण्यात आली. छातीत गोळी घालून एका तृतीयपंथीचा जीव घेण्यात आल्यानंतर तृतीयपंथी समाज आक्रमक झालाय. या हत्येप्रकरणी एकाला ताब्यातही घेण्यात आलं असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. छातीत गोळी लागल्याचं कळल्यानंतर जखमी तृतीयपंथीयाला जवळच्याच श्री राम रुग्णालयात उपचारासाठी नेलं जात होतं. मात्र उपचाराआधीच जखमी तृतीयपंथीचा मृत्यू झाला होता.
Agitated transgenders block roads & protest against the govt over the killing of 2 transgenders in Patna, Bihar in the last 24 hours
One of the transgender was shot dead today morning. We demand proper investigation and security for the community: Pooja, a protesting transgender pic.twitter.com/INXPOovobB
— ANI (@ANI) December 21, 2021
न्यायची प्रतीक्षा
दरम्यान, आता पाटण्यातील कंकडबाग परिसरात तणावपूर्ण वातावरण असून यावेळी संतप्त तृतीयपंथींनी पोलिसांवरही दगडफेक केल्याचं सांगितलं जातंय. यानंतर पोलिसांनीहीह तृतीयपंथीवर लाठीचार्ज केल्यानं तणाव आणखी वाढलाय. यावेळी जाळपोळ, दगडफेक आणि जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणाचा तातडीनं तपास करत दोषींना कठोरातली कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी करण्यात तृतीयपंथी समाजाकडून करण्यात आली आहे.
इतर बातम्या –
Chennai Crime: मुलींचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या, पीडित तरुणींनीच काढला काटा
अपघाताचा बनाव करुन मुंबईत 35 लाखांची लूट, 25 ठिकाणांचे CCTV फुटेज तपासून आरोपीला अटक