नाशिकमध्ये भीषण अपघात, कारची उभ्या ट्रकला धडक; दोन मॅनेजरसह मार्केटिंग प्रतिनिधी जागीच ठार

नाशिक जिल्हा बुधवारी भीषण अपघाताने हादरला. एका कारने उभ्या असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यात एका औषध कंपनीचे दोन मॅनेजर, एक मार्केटिंग प्रतिनिधी जागीच ठार झाले.

नाशिकमध्ये भीषण अपघात, कारची उभ्या ट्रकला धडक; दोन मॅनेजरसह मार्केटिंग प्रतिनिधी जागीच ठार
नाशिक-पुणे महामार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला होता.
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 4:28 PM

नाशिकः नाशिक जिल्हा बुधवारी भीषण अपघाताने हादरला. एका कारने उभ्या असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यात एका औषध कंपनीचे दोन मॅनेजर, एक मार्केटिंग प्रतिनिधी जागीच ठार झाले.

या भयंकर अपघातातबाबत सविस्तर माहिती अशी की, कारमधील शरद गोविंदराव महाजन (वय 39, रा. म्हसरूळ, नाशिक), भूषण बाळकृष्ण बधान (वय 36, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) आणि राजेश तिवारी (वय 34, रा. कल्याण, ठाणे) हे तिघे मॅनकाईन्ड या औषध कंपनीत काम करायचे. पुण्यात त्यांची बैठक होती. ही बैठक आटोपून ते नाशिककडे निघाले होते. बुधवारी पहाटे त्यांची कार नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे परिसरात आली. येथे हॉटेल अन्वितासमोर एक आयशर ट्रक (टी. एस. 30 टी. 8886) उभा होता. मात्र, स्विफ्ट कारच्या चालकाने (एम. एच. 15 सी. टी. 1721) पाठीमागून आयशरला धडक दिली. त्यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृतदेहांचे दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताने घटनास्थळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, महामार्ग पोलिसांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवली आणि मदतकार्यही केले.

तरुणाला ट्रकने उडवले

नाशिकमध्ये द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर घडली. यात घटनेत एका ट्रकने धडक दिल्यामुळे 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत झालेला तरुण अविनाश राजेंद्र सूर्यवंशी हा जळगाव जिल्ह्यातल्या गलवाडा येथील होता. सध्या तो सिडकोतल्या दत्त चौकात रहायचा. याबाबत माहिती अशी की, अविनाश हा द्वारका सर्कलकडून दुचाकीवर (एम. एच. 15 डीजी 2239) उड्डाणपुलावरून सिडकोकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (एम.पी. 09 एच.एच.8267) त्याच्या दुचाकीला उडवले. या घटनेत अविनाश जबर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

नाशिकमध्ये दुचाकीवरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश कारभारी शिंदे (वय 30) असे मृताचे नाव आहे. ही घटना औद्योगिक वसाहतीत झाली. याबाबतची माहिती अशी की, महेश शिंदे हे एमआडीसीतून श्रमिकनगरकडे चालला होता. मात्र, अचानक धावत्या दुचाकीवरून ते रस्त्यावर पडले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे हे करत आहेत.

इतर बातम्याः

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीबाहेर, तरीही नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज; म्हणे 19 तारखेलाही झोडपणार

यंदा सोनं पावणार; दसरा सण मोठा, नाशिकमध्ये नाही आनंदाला तोटा!

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.