Punjab Terrorist Arrest : स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवादी कट उधळला, पंजाब पोलिसांकडून इसिसच्या चार सदस्यांना अटक, शस्त्रे जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांकडून तीन ग्रेनेड, एक आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस), दोन पिस्तुले आणि 40 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Punjab Terrorist Arrest : स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवादी कट उधळला, पंजाब पोलिसांकडून इसिसच्या चार सदस्यांना अटक, शस्त्रे जप्त
काश्मिरात पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 6:57 PM

पंजाब : स्वातंत्र्य दिनापूर्वी एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश (Exposed) करण्यात पंजाब पोलिसांना मोठे यश आले आहे. दिल्ली पोलिसांच्या मदतीने पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI या दहशतवादी संघटनेचा कट उधळून लावला आहे. सध्या याप्रकरणी चार दहशतवाद्यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांकडून तीन ग्रेनेड, एक आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस), दोन पिस्तुले आणि 40 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसाआधी, पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने एक मोठा दहशतवादी कट उधळून लावल्याचे पंजाब पोलिसांनी ट्विट (Tweet) करत म्हटले आहे. कॅनडाचा अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियाचा गुरजंत सिंग यांच्याशी संबंधित मॉड्यूलच्या चार सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये सात सशस्त्र अतिरेक्यांना अटक

दुसरीकडे, स्वातंत्र्य दिनापूर्वी मणिपूरच्या विविध भागांतून प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सात सशस्त्र अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. थौबल जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक एच जोगेशचंद्र यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान सरकारी प्रतिष्ठान आणि सुरक्षा दलांना स्फोटकांनी लक्ष्य करण्याचा कट रचल्याची माहिती आसाम रायफल्सला शनिवारी सकाळी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, थौबल जिल्हा पोलिस आणि 16 आसाम रायफल्सचे संयुक्त पथक येरीपोक मार्केटमध्ये पोहोचले आणि त्यांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था

स्वातंत्र्य दिनापूर्वी काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्व हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन, स्नायपर आणि साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. समारंभात व्यत्यय आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शहरात आणि खोऱ्यातील विविध ठिकाणी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संशयास्पद व्यक्ती आणि वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच खोऱ्यातील अनेक ठिकाणी लोकांचा शोधही घेतला जात आहे, असे ते म्हणाले. (Terror plot foiled before Independence Day, four ISIS members arrested, weapons seized)

हे सुद्धा वाचा

783096

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.