मनसुख हिरेन हत्या कटात 11 जण सहभागी, सचिन वाझे सूत्रधार, ठाणे ATS चा तपास निर्णायक टप्प्यावर

हत्येच्या दिवशी म्हणजेच चार मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन अर्धा तास कुणाशी तरी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलत होते (Thane ATS Mansukh Hiren death )

मनसुख हिरेन हत्या कटात 11 जण सहभागी, सचिन वाझे सूत्रधार, ठाणे ATS चा तपास निर्णायक टप्प्यावर
mansukh hiren
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 11:35 AM

ठाणे : मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात (Mansukh Hiren death case) 11 जण सहभागी होते, अशी धक्कादायक माहिती ठाणे दहशतवाद विरोधी पथकाला (Thane ATS) मिळाली आहे. या सर्व कटाचे सूत्रधार अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) असल्याचे ठोस पुरावेही एटीएसला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Thane ATS solved Mansukh Hiren death case Sachin Vaze alleged Mastermind)

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या ठिकाणी प्रत्यक्ष चार ते पाच जण उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकला, या ठिकाणी अटक आरोपी विनायक शिंदे स्वतः उपस्थित होता, असंही तपासात समोर आलं आहे.

मनसुख हिरेन यांचा अर्धा तास व्हॉट्सअॅप कॉल

हत्येच्या दिवशी म्हणजेच चार मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन अर्धा तास कुणाशी तरी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलत होते. हे नंबर अनोळखी होते, हेच सिमकार्ड बुकी नरेश गोर याने उपलब्ध करुन दिले असण्याची शक्यता आहे. या सर्व कटाचे सूत्रधार सचिन वाझे असल्याचे ठोस पुरावे एटीएसला मिळाले आहेत.

शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे. “अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. ही केस माझ्या संपूर्ण पोलीस करिअरमधील सर्वात जटील केसमधील एक आहे” असं शिवदीप लांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

तपास एनआयएकडे

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा (Mansukh Hiren death case) तपास एनआयएकडे (NIA) सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) हा मोठा धक्का मानला जात आहे. (Thane ATS solved Mansukh Hiren death case Sachin Vaze alleged Mastermind)

ईडीचेही शुक्लकाष्ठ महाविकास आघाडीमागे?

राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर (NIA) आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या लेटरबॉम्बमध्ये 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप आहे. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द

(Thane ATS solved Mansukh Hiren death case Sachin Vaze alleged Mastermind)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.