पोलिसांसमोरच तरुणावर प्राणघातक हल्ला, कळवा पोलिसांकडून तिघांना अटक

ठाणे येथील कोपरी भागात दहा जणांच्या टोळीने 18 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले (Attack On Youth In Kalwa).

पोलिसांसमोरच तरुणावर प्राणघातक हल्ला, कळवा पोलिसांकडून तिघांना अटक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 3:36 PM

ठाणे : ठाणे येथील कोपरी भागात दहा जणांच्या टोळीने 18 वर्षाच्या मुलाचे अपहरण केले (Attack On Youth In Kalwa). त्याला कळवा मार्गे पळवून नेत असताना अपहरणकर्ता मुलगा रिक्षातून उतरुन एका इमारतील लपण्यासाठी पळून गेला. त्याचा शोध घेत असताना इमारतीमधील मुलाने अडवून जाब विचारल्यावर दोन गटामध्ये बाचाबाची होऊन चाळीस वर्षांच्या तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला केलाय (Attack On Youth In Kalwa).

या तरुणावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून कळवा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. 19 फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सर्वात धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडलाय.

नेमकं काय घडलं?

ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात राहणारा हर्षद गायकवाड याचे पूर्ववैमन्यासातून कोपरीतील 10 जणांच्या गटाने अपहरण केले. त्याला कळवा मार्गे पळवून नेत असताना कळवा प्रशांत कॉर्नर नजीक हर्षेदने रिक्षातून उडी मारुन जवळच्या एका इमारतीत धाव घेत लपून बसला. त्याला शोधण्यासाठी रिक्षातील तरुण या इमारतीत जात असताना वॉचमनने त्यांना अडवले. त्यावरुन बाचाबाची झाली.

यावरुन इमारतीच्या काही तरुणांनी कोपरीच्या तरुणांना जाब विचारला. या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यातून या इमारतीत राहणाऱ्या विराज परब यांच्यावर या तरुणांनी धारदार चॉपरने प्राणघातक हल्ला केला. विराज या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तिघांना कळवा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सर्वात गंभीर बाब म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. तर घटनेचा पुढील तपास सुरु असून या हल्ल्यातील इतर आरोपींचा कळवा पोलीस शोध घेत आहेत.

Attack On Youth In Kalwa

संबंधित बातम्या :

कुत्रा चावल्याच्या रागातून कुत्र्याचा जीव घेतला, डोंबिवलीत आरोपी तरुणाला अटक

VIDEO | तडीपार गुंडाचा पुण्यात हैदोस, कोयता नाचवत दहशत पसरवण्याचा प्रयत्न

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.