थेट थाई महिलांकडून देहव्यापार; ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

ठाणे पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. ठाण्यात थाई महिलांकडून देह व्यापार केला जायचा. पोलिसांनी या देहव्यापार करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

थेट थाई महिलांकडून देहव्यापार; ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
prostitutionImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 6:27 PM

ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. थाई महिलांच्या साथीने हे सेक्स रॅकेट सुरू होतं. या प्रकरणी पोलिसांनी बागदी अब्दुल्ला नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. थाई महिलांना बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवून देण्यासाठी मदत करण्याचं त्याने आश्वासन दिलं होतं. त्या बदल्यात तो या महिलांकडून शरीर विक्रयचा धंदा करून घेतल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

बागदी अब्दुल्ला मुगेद साद (वय 42) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांना गेल्या आठवड्यातच या रॅकेटची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मानवी तस्करी विरोधी पथकाच्या एका टीमला एका हॉटेलात पाठवलं. या टीमने हॉटेलात छापेमारी केली. यावेळी एका 44 वर्षीय थाई महिलेला अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली.

थाई महिलांची फसवणूक

या हॉटेलमधून तीन थाई महिलांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. या चारही महिलांची चौकशी केल्यानंतर अब्दुल्ला सादने त्यांना बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्ड मिळवून देण्यात मदत केली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अब्दुल्ला मुगेद साद आणि या चारही थाई महिला पासपोर्ट आणि व्हिजाचा अवधी संपल्यानंतरही भारतात राहत होते. या सर्वांविरोधात पोलिसांनी विदेशी नागरिक अधिनियमच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

याच वर्षी ठाण्यात फेब्रुवारीत एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. या रॅकेटमध्ये फिल्म अभिनेत्रींचा सर्वाधिक समावेश होता. यातील अनेक नट्या पैसे कमावण्याच्या लालसेपोटी तर अनेकजणी मजबुरीने या धंद्यात ओढल्या गेल्या होत्या. एका फिल्म प्रोडक्शनच्या आडून हा धंदा सुरू होता.

अभिनेत्रींना पैशाची लालूच

एका लग्जरी हॉटेलात पोलिसांनी तेव्हा छापेमारी केली होती. एक सिने निर्माताच हा धंदा चालवत असल्याचं समोर आलं होतं. सोलोमन रत्नमय्या नरकंथेलू असं या निर्मात्याचं नाव होतं. त्याला पोलिसांनी अटक केली होती. हिंदी सिनेमा, टीव्ही सीरिअल, वेब सीरीज, फोटो शूट आणि यूट्यूब व्हिडीओत काम करणाऱ्या अभिनेत्रींना एक्स्ट्रा पैसा कमावण्याची लालच दाखवून तो देह व्यापाराच्या धंद्यात त्यांना ढकलत होता. पोलिसांनी तेव्हाही या अभिनेत्रींची सुटका केली होती.

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....