उल्हासनगरात ऑन ड्युटी पोलिसावर चाकूने हल्ला, घटनेने परिसरात खळबळ
ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठाणे : ऑन ड्युटी पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगरच्या कॅम्प-4 भागात गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याठिकाणी पैशांच्या व्यवहारातून दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर हत्यारं उगारली होती. त्याचवेळी पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे गस्तीवर होते. हाणामारीचा प्रकार बघून त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यातील एका गटाने थेट पोलिसांवरच चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केलं.
विशेष म्हणजे पोलिसांजवळ कोणत्याही प्रकारचं शस्त्र नसतानाही त्यांनी हिंमतीने मध्ये पडत हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केली नसती, तर दोन्ही गटातील लोकांच्या हत्या झाल्या असत्या, अशीही माहिती समोर आलीये. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणून गंभीर दुखापत या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
कल्याणमध्ये बिल्डरच्या ऑफिसवर हल्ला
कल्याणमधील एका बिल्डरच्या ऑफिसवर हल्ल्याचा प्रकार घडला. बिल्डर संजय गायकवाड यांच्या गौरी विनायक डेव्हलपर्स या कार्यालयावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला.
कार्यालयाबाहेर असलेला सुरक्षारक्षकाला हल्लेखोरांनी धक्काबुक्की केली. कार्यालयाच्या काचा फोडल्या. हे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सदर हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.
“दोन ते तीन लोक हातात लाकडी दंडुके घेऊन आले. त्यांनी ऑफिसबाहेरील काचा फोडल्या. आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेत. संबंधितांनी असा प्रकार का केला असावा, नेमकं काय कारण असावं, याचा शोध घेतला जात” असल्याचं कोळसेवाडी पोलिसांनी सांगितलं.
Video : कल्याणमध्ये बिल्डरच्या ऑफिसवर हल्ला, लाकडी दंडुक्यांनी काचा फोडल्याhttps://t.co/dyolOO5B2J#maharashtra #kalyan
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
संबंधित बातम्या :
शिरजोर चोरट्यांची दसऱ्यादिवशी सलामी; गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून नाशिकमध्ये 23 लाखांची धाडसी चोरी