Thane Police : ठाणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला 58 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन, मोबाईल चोरी अशा एकूण 59 गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश होता. तर परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या वर्तकनगर पोलिसांनी देखील 35 लाखांहूनचा अधिक जप्त मुद्देमाल तक्रादारांना परत केला. त्यात 35 मोबाईल, मोटारसायकल, सोनसाखळी व रोकड अशा मुद्देमालाचा समावेश होता. 58 लाखाचा मुद्देमाल अनेक गुन्ह्यातून जमा झाला होता.

Thane Police : ठाणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला 58 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत
विविध गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करताना ठाणे परिमंडळ -5 चे उपायुक्त डॉ . विनय राठोड व आदीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:22 PM

ठाणे : यंदाचा स्वातंत्र्य (Amrit Mahotsav) अमृत महोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्यात आलेला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वेगळेपण दाखवण्यात आले होते. (Thane Police) ठाणे पोलीसांनीही असाच उपक्रम राबवला असून त्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयतर्फे विविध गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल (Back to the complainants) तक्रारदारांना परत करण्यात आलेला आहे. तब्बल 58 लाख 89 हजार 569 इतक्या किमतीचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत केला गेला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयतर्फे विविध गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल परत करण्यासाठी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारांमधून तर समाधान होत आहेच पण अमृत महोत्सवी अनेकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना नागरिकांची झाली होती.

न्यायालयाच्या आदेशाने माल परत

तक्रारदारांना त्यांचा माल परत करण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया ही पोलीस प्रशासनाने पूर्ण केली. त्यानंतरच या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. शहर पोलीस दलातील पाच परिमंडळात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायालयाच्या आदेशान्वये तक्रारदारांना त्यांच्या मालकीचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी परिमंडळ एकच्या पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला एकूण 58 लाख 89 हजार 569 इतक्या किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला.

या गु्न्ह्यामध्ये झाली होती कारवाई

सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन, मोबाईल चोरी अशा एकूण 59 गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश होता. तर परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या वर्तकनगर पोलिसांनी देखील 35 लाखांहूनचा अधिक जप्त मुद्देमाल तक्रादारांना परत केला. त्यात 35 मोबाईल, मोटारसायकल, सोनसाखळी व रोकड अशा मुद्देमालाचा समावेश होता. 58 लाखाचा मुद्देमाल अनेक गुन्ह्यातून जमा झाला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा मुद्देमाल देण्यात आला आहे. यामध्ये पोलीसांचेही अथक परीश्रम कामी आले आहेत.

तक्रारदारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद

चोरी झालेल्या वस्तूंच्या किंमतीपेक्षा त्या वस्तूचे वेगळेच महत्व असते. आणि एकदा का चोरी झाली म्हणले की ती वस्तू परत मिळेलच असे काही नसते. पण ठाणे पोलीस आयुक्तालयतच्या सर्वच पोलीसांनी यासाठी अथक परिश्रम घेतले होते. शिवाय अनेक दिवसानंतर चोरीला गेलेला मुद्देमाल आपल्या हाती परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाला ठाणे परिमंडळ -5 चे उपायुक्त डॉ . विनय राठोड उपस्थित होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.