Palghar Crime : चार दिवसापासून बेपत्ता चालकाचा अखेर शोध लागला, सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसला !

नेहमीप्रमाणे कार चालक गाडीवर गेला होता. तीन भाडेकरुंना नाशिकला घेऊन गेला तो परतलाच नाही. चार दिवस घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर अखेर शोध लागला.

Palghar Crime : चार दिवसापासून बेपत्ता चालकाचा अखेर शोध लागला, सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसला !
भाडेकरुंना घेऊन चाललेल्या कार चालकाचा मृतदेह आढळलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 6:46 PM

पालघर / 15 ऑगस्ट 2023 : भाडे घेऊन गेलेला तरुण अचानक बेपत्ता झाला. चार दिवस घरचे आणि पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर चार दिवसांनी पोलिसांचा शोध थांबला आणि चालक सापडला. पण तो मृतावस्थेत आढळला. त्र्यंबकेश्र्वरच्या हद्दीत अंबोली घाटात चालकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आसिफ असे मयत चालकाचे नाव आहे. आसिफची कार घेऊन भाडेकरु फरार झाले. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आसिफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

सदर कार पालघरमधील गणेश नगर परिसरातील महेश सूर्यवंशी यांच्या मालकिची आहे. शनिवारी पालघारहून नाशिक येथे तीन भाडेकरुंना घेऊन महेश यांचा चालक निघाला होता. शनिवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास पलघारहून नाशिक जाण्यासाठी निघाला होता. मात्र भाडं नाशिकपर्यंत असताना नाशिकच्या पुढील टोलवरील टोल फास्टटॅगने पैसे कट झाल्याने गाडी मालक महेश सूर्यवंशी यांना संशय आला. त्यांनी चालक आसिफ घाची याला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र आसिफने फोन उचलला नाही. बराच वेळ आशिफचा फोन लागत नव्हता.

यानंतर गाडीचं लोकेशन तपासलं असता दुसऱ्या दिवशी रविवारी ही गाडी थेट छत्तीसगड येथे पोहचल्याचं गाडी मालक महेश सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आलं. मात्र छत्तीसगडमधील एका टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गाडीतील चालक आसिफ घाची नसून दुसराच माणूस गाडी चालवत असल्याने पालघर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

चालक आसिफ घाची यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पालघर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस सर्वत्र आसिफचा शोध घेत होता. या दरम्यान आज दुपारी 2 च्या सुमारास आसिफ घाचीचा कुजलेल्या अवस्थेत शव त्र्यंबकेश्र्वरच्या हद्दीत अंबोली घाटात मिळून आला. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरु आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.