सांगली – म्हैसाळ गावात एकाच कुटुंबातील दोन भावांच्या कुटुंबातील 9जणांचे मृतदेह (family Suicide)सापडल्यानंतर, आता पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. सांगली जिल्ह्याच्या पोलीस दलातील मोठे अधिकारी (police officers)सकाळपासून म्हैसाळ गावात तळ ठोकून होते. आता या प्रकरणात फॉरेन्सक तपासणी करण्यात आली असून, या मृतदेहांचा तपास करण्यात आला आहे. या मृतदेहांपैकी एका मृतदेहाच्या शिखात एक सुसाईड नोट (Suicide note)सापडली आहे. य़ा सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसाळ गावात दोन घरांमध्ये 9मृतदेह सापडले आहेत. दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबीयांचे एकत्रित मृतदेह सापडले आहेत. या ठिकाणी मृतदेहांवर कोणतेही जखमांचे किंवा मारहाणीचे वण नाहीत. प्रथमदर्शनी हा आत्महत्या वाटत असली तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. फॉरेन्सक टीमच्या सहाय्याने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. मृतदेहापैकी एका मृतदेहाच्या खिशात सुसाीड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटशी पुरावे जुळवून पुढील तपास करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. मात्र या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय कारण आहे, हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अजूनही नेमकं ९ जणांच्या आत्महत्येचं कारण काय, याचं गूढ कायम आहे.
डॉक्टर माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे या दोन भावांच्या दोन घरातून त्यांच्यासह नऊ मृतदेह सापडले आहेत. डॉ. माणिक यांच्या घरातून त्यांच्या आई आणि पुतण्यासह 6मृतदेह सापडले आहेत. या प्रकरणात आर्थिक विवंचनेतून या कुटुंबाने आत्महत्या केली का, असा प्रश्न पोलीस अधीक्षकांना विचारला असता, त्यांनी याला ठोस उत्तर दिलेले नाही. आर्थिक विवंचनेसह इतरही अनेक कारणे यामागे असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बाजूंनी तपास करुन या प्रकरणात निष्कर्षापर्यंत पोहचता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या सुसाईड नोटमध्ये काय आहे, यातूनच सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या सुसाईड नोटमध्ये काय आहे, याचा तपशील पोलीस उघड करतील, तेव्हाच या प्रकरणाचे कारण स्पष्ट होईल, आणि या गूढ 9आत्महत्या प्रकरणाचे सत्य समोर येणार आहे.