कोंबड्यांची झुंज लावणं पडलं महागात, पोलिसांनी घडवलेली अद्दल आली चर्चेत, कुठं काय घडलं ?
चंद्रपूर जिल्ह्यात कोंबड बाजार भरविणे यावर बंदी आहे. विशेष म्हणजे कोंबडयांची झुंज लावून जुगार खेळण्यावर बंदी असतांना सर्रासपणे हा खेळ सुरू असतो.
निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपुर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने कोंबड्यांचा अवैध बाजार सुरू असल्याची चर्चा गावागावात सुरू होती. मात्र, चंद्रपूर पोलीस कारवाई करत नसल्याने पोलीसांच्या विरोधात उलटसुलट चर्चा सुरू होती. याच दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेची माहिती पोलीसांच्या कानावर पडली होती. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मौजा मंदा तुकूम गावाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे. जंगल परिसर असलेल्या ठिकाणी काही जण अवैध रित्या कोंबडयांची झुंज लढवून जुगार खेळला जात होता. याच ठिकाणी मूल पोलीसांनी छापा टाकत 13 जणांना गजाआड केले आहे. यामध्ये तीन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. या कारवाईनंतर चंद्रपूर पोलिसांचे स्वागत होत असून इतरही ठिकाणी सुरू असलेला कोंबड बाजारावर बंदी असतांना सुरू असलेला अवैध बाजारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोंबड बाजार भरविणे यावर बंदी आहे. विशेष म्हणजे कोंबडयांची झुंज लावून जुगार खेळण्यावर बंदी असतांना सर्रासपणे हा खेळ सुरू असतो.
चंद्रपूर पोलिस याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे, त्यामागील कारणांची चवीने चर्चाही केली जाते.
परंतु, चंद्रपूर पोलीसांनी केलेली कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, कोंबड्यांची झुंजीवर पैज लावणे तेरा जणांचा चांगलेच अंगलट आले.
पोलिसांनी कोंबड बजावर धाड टाकली आहे. यामध्ये तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तेरा जणांना अटक केली आहे.
पोलीसांनी या कारवाईवर समाधान न मानता कोंबडच्या अवैध बाजारावर आणि त्यावरून सुरू असलेला गैरकृत्याची पाळेमुळे खोदुन नष्ट करणे गरजेचे आहे.