तीन श्वानांचा अचानक मृत्यू, हैराण करणारा प्रकार, प्राणी प्रेमींमध्ये संताप
एक हैराण करणारा प्रकार पुढे आलाय. या प्रकारामुळे लोकांमध्ये मोठा संताप हा बघायला मिळतोय. हेच नाही तर थेट पोलिसांमध्ये धाव घेण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा देखील दाखल केला असून पुढील तपास हा देखील सुरू करण्यात आलाय. या प्रकरणात काही मोठे खुलासेही होऊ शकतात.
मुंबई : नुकताच एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. या प्रकारानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर या प्रकारानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. लोकांच्या चुकीमुळे थेट तीन श्वानांचा मृत्यू झालाय. आता हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहचले आहे. प्राणी प्रेमींकडून या प्रकरणात कडक कारवाई करण्याची मागणी ही सातत्याने केली जातंय. हेच नाही तर अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल झालाय. एका श्वानावर अजूनही उपचार सुरू आहेत. मात्र, तिघांचा मृत्यू झालाय.
या श्वानांचा मृत्यू हा विषारी अन्नपदार्थ खाऊन झाल्याचे सांगितले जातंय. पवईत ही हैराण करणारी घटना घडलीये. आता पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा हा देखील दाखल करण्यात आलाय. या परिसरात नागरिक सर्रासपणे अन्नपदार्थ हे रस्त्याच्याकडेला टाकतात. फेकलेले विषारी अन्न खाल्याने या श्वानांच मृत्यू झाला आहे.
एका श्वानावर उपचार सुरू असून याबाबत पार्कसाईट पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केलाय. हेच नाही तर पोलिसांनी या प्रकरणात तपास देखील सुरू केल्याचे कळतंय. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पवईच्या सनसिटी सोसायटीच्या परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली.
पवईच्या सनसिटी सोसायटी परिसरात फेकलेले विषारी अन्न हे चार श्वानांनी खाल्ले होते. त्यानंतर ते श्वान अत्यावस्थ अवस्थेत सापडले. हा प्रकार सोसायटीच्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्याने ही माहिती ट्रीजा टेकेकरा यांनी माहिती दिली. हा घडलेला प्रकार तत्काळ पोलिसांना कळवण्यात आला.
माहिती मिळताच पोलिस देखील लगेचच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने ट्रीजा टेकेकरा यांनी चार श्वानांना परेल येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच यातील तीन श्वानांचा मृत्यू झाला. अजूनही एका श्वानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पार्कसाईट पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.