कंटेरनच्या धडकेत बसचालक दीडशे मीटर फरफटला; लासलगाव स्टँडसमोरील भयावह घटनेत जागीच मृत्यू, दोन दुकानांचेही नुकसान

बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर एसटीला कंटेनरने कट मारल्याने बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. संदीप निकम असे मृत चालकाचे नाव असून, या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झालाय.

कंटेरनच्या धडकेत बसचालक दीडशे मीटर फरफटला; लासलगाव स्टँडसमोरील भयावह घटनेत जागीच मृत्यू, दोन दुकानांचेही नुकसान
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 11:30 AM

लासलगावः बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर एसटीला कंटेनरने कट मारल्याने बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. संदीप निकम असे मृत चालकाचे नाव असून, या अपघातानंतर कंटेनरचालक फरार झालाय.

सध्या राज्यभर विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज शनिवार, सकाळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ आणि लासलगाव बस आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व कर्मचारी यांच्यात चर्चा झाली. न्यायालयाचा आदेश असल्याने बससेवा सुरू करावी लागेल, असा निर्णय झाला. त्यानंतर संदीप निकम हे चालक नाशिकसाठी लासलगाव आगारातून एक बस (MH 14,BE 3641) घेऊ येत होते. बस आणण्यापूर्वी ते गाडी थांबवून बसची पाहणी करत होते. नेमक्या त्याचवेळी एका कंटेनरने ( MH 43, Y 7463) बसला कट मारण्याच्या नादात चालक निकम यांना उडवले. अपघात इतका भीषण होता की, निकम हे कंटेनरसोबत जवळपास दीडशे मीटर फरफट गेले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. कंटरेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो पेट्रोल पंपासमोरील योगेश ऑटोमोबाईल्स आणि लतीफ स्प्रे पेंटिंग दुकानात घुसला. यामुळे या दोन्ही दुकानांचेही मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर कंटेनरचालक वाहन सोडून फरार झाला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

आठवड्यात जिल्ह्यातली दुसरी घटना

वाहनधारक फरफटत जावून मृत होण्याच्या अपघाताची ही जिल्ह्यातील आठवड्यातली दुसरी घटना आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यात इगतपुरी परिसरातील पारदेवीजवळ बाईक आणि क्रेटा कार यांचा भीषण अपघात झाला. कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बाईकसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला. हा अपघात इतका भीषण होता, की अपघातात नाशकातील डाक बंगला परिसरात राहणाऱ्या करण मनोहर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडी पेटवून दिली होती.

दोन तरुणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या निफाडतालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रानवड शिवारात हे दोन वेगवेगळे अपघात झाले असून, दोन्ही घटनेत चारचाकी वाहनाने मोटारसायकल स्वारांना उडवले आहे. पहिल्या घटनेत रानवडहून पिंपळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका मोटारसायकलला (एम.एच. 15 जी. एन. 1118) पाठीमागून धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील आकाश सोमनाथ गिते (वय 24, रा. पालखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत पिंपळगावहून रानवडे जाणाऱ्या पिकअप गाडीच्या (एम. एच. 15 बी. 2659) चालकाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (एम. एच. 15 एफ. ए. 9773) जोरदार धडक दिली. यात घटनेत मोटारसायकलवरील संदीप शिवराम रसाळ (वय 32, रा. आहेरगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्याः

भुजबळ-पंकजा नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर; भाजपच्या महापालिका सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देणाऱ्या आमदार फरांदेंनी जुळवून आणला योग

पवारांवरील टीकेवरून ‘राष्ट्रवादी’ आक्रमक; भोसलेंना शहरात फिरू देणार नाही, युवक शहराध्यक्ष खैरे यांचा इशारा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.