परीक्षेत कॉपी करत असल्याच्या संशयातून शिक्षकाने उतरवले कपडे, घरी जाताच विद्यार्थिनीने पेटवून घेतले

जमशेदपूरमधील छायानगरमध्ये राहणारी पीडित मुलगी साकची येथील शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. सध्या शाळेत परीक्षा सुरु आहे. परीक्षेवेळी पीडित मुलगी कॉपी करत असल्याचा शिक्षिकेला संशय आला.

परीक्षेत कॉपी करत असल्याच्या संशयातून शिक्षकाने उतरवले कपडे, घरी जाताच विद्यार्थिनीने पेटवून घेतले
झारखंडमध्ये कॉपी केल्याच्या संशयातून मुलीसोबत भयंकर कृत्य
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 6:33 PM

झारखंड : परीक्षेत कॉपी केल्याच्या संशयातून शिक्षकेने कपडे उतरवल्याने विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न (Attempt to killed herself) केल्याची घटना झारखंडमधील जमशेदपूरमध्ये घडली आहे. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर भाजली (Burned) आहे. तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक (Critical condition) असल्याने तिला टीएमएचमध्ये रेफर करण्यात आले आहे.

पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकते

जमशेदपूरमधील छायानगरमध्ये राहणारी पीडित मुलगी साकची येथील शाळेत इयत्ता नववीत शिकत होती. सध्या शाळेत परीक्षा सुरु आहे. परिक्षेवेळी पीडित मुलगी कॉपी करत असल्याचा शिक्षिकेला संशय आला.

शिक्षिकेने सर्वांसमोर कपडे उतरवले

संशयातून शिक्षिकेने मुलीला वर्गात सर्वांसमोर कपडे उतरवायला सांगितले आणि मारहाण केली. यामुळे मानसिक तणावात आलेल्या मुलीने घरी जाऊन स्वतःला पेटवून घेतले, अशी माहिती मुलीने पोलीस जबाबात दिली आहे. आपण कोणतीही कॉपी केली नसल्याचे मुलीने सांगितले.

हे सुद्धा वाचा

मुलीची प्रकृती चिंताजनक

या घटनेत मुलगी 80 टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला आहे. संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेचा तपास सितारामडेरा पोलीस करत आहेत.

याबाबत शाळेशी संपर्क साधला असता, मुलगी परीक्षेत कॉपी करत होती. यामुळे शिक्षिकेने तिला दम दिला. कपडे उतरवण्याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती आली नसल्याचे शाळेच्या मुख्याधिपकांनी सांगितले.

शाळेतून आल्यानंतर मुलगी तणावात होती

मुलीच्या घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे, मुलगी शुक्रवारी परीक्षेचा पेपर देऊन घरी आली तेव्हा खूप तणावात होती. त्यानंतर शाळेच्या युनिफॉर्मवरच तिने स्वतःला पेटवले. घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. शाळेत कपडे उतरवल्याची माहिती मुलीच्या मैत्रिणीने दिली.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.