पत्नीला धडा शिकविण्यासाठी पतीनं उचललं हे ह्रदयद्रावक पाऊलं, बापानं असा उगवला सूड
पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत होती. पत्नीला धडा शिकवण्यासाठी आरोपीने मुलाची हत्या केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुंबई : मुंबईतील मालवणी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीला धडा शिकवण्यासाठी मालवणी चर्च गावात राहणाऱ्या एका पित्याने ह्रदयद्रावकं पाऊल उचललं. आपल्या पाच वर्षांच्या निष्पाप मुलाचा गळा चिरून चाकूने खून केला आहे. पोलिसांनी सांगितले की, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आरोपीच्या मोठ्या मुलीने तिला शाळेत सोडण्यास सांगितले. परंतु तिने तिला घेतले नाही.
त्यानंतर आरोपीची पत्नी आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. दरम्यान, आरोपीने झोपलेल्या पाच वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केला. या घटनेनंतर मारेकरी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, नंदन खेमसिंग अधिकारी असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 38 वर्षे असून तो भाजीविक्रेत्याचे काम करतो. लक्ष्य असे मृत मुलाचे नाव आहे. तो ज्युनिअर केजीमध्ये शिकत होता.
पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत होती. पत्नीला धडा शिकवण्यासाठी आरोपीने मुलाची हत्या केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. असं पोलीस निरीक्षक सुनील बिले यांनी सांगितलं.
पती-पत्नीमध्ये वाद होतच असतात. परंतु, नराधम बाप या टोकाला जाईल, असं कुणाला वाटलं नाही. त्यानं पत्नी घराबाहेर गेल्याचं पाहून स्वतःच्या मुलालाचं संपविलं.
पत्नी घरी आली तेव्ही ती हादरली. काय करावं तिला काही सूचत नव्हतं. शेवटी पोलिसांत तक्रार गेली. नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. मुलाला बापानं संपविलं. बाप जेलमध्ये जाणार. त्यामुळं पत्नी व तिची मुलगी एकाकी पडले आहेत.