Sameer Wankhede: समीर वानखेडे प्रकरणी पुढील जात पडताळणी सुनावणी 18 जानेवरीला होणार
नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्या जातीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यामुळे आज या समिती समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. समीर वानखडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना शेड्युल कास्टमध्ये असल्याचं नमूद केलं होतं.
मुंबई : समीर वानखडे प्रकरणाची आज जात पडताळणी समिती समोर सुनावणी झाली. नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्या जातीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यामुळे आज या समिती समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. समीर वानखडे यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना शेड्युल कास्टमध्ये असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे या समिती समोर आज ही सुनावणी झालीय.
समीर वानखेडेंचं खरं नाव येत्या सुनावणीत सादर करण्याचे आदेश – अॅड. सातपुते
समीर वानखेडे प्रकरणाची आज जात पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे. आज समीर वानखडे यांच्या वकिलाने समीर यांच्याकडे जात प्रमाण पत्र नसल्याचं कोर्टाला सांगितलंय. जात पडताळणी दाखला आहे का असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यामुळे या समितीला समीर यांच्या जातीची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यांचं खरं नाव काय आहे ? हे येत्या सुनावणीत शपथपत्राद्वारे सादर करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती नवाब मलिक यांचे वकिल ऍड. नितीन सातपुते यांनी दिली.
जात प्रमाणपत्र आहे पण वैधतेचे प्रमाणपत्र नाही – अॅड. राणे
जात पडताळणी समितीसमोर आज सुनावणी झाली असून आम्हाला पुढची तारीख देण्यात आली आहे. आम्ही आज आमचं म्हणणं मांडलेलं आहे. जातीचे प्रमाणपत्र आमच्याकडे आहे, पण वैधतेचं प्रमाणपत्र आमच्याकडे नाही. ते सादर करण्यासाठी आम्ही पुढची तारीख घेतली, अशी माहिती समीर वानखेडे यांचे वकील अॅड. रामचंद्र राणे यांनी दिली.
आर्यन खान अटक प्रकरणानंतर समीर वानखेडे प्रसिद्धी झोतात
बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक आणि क्रूझ ड्रग्ज कारवाई प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचे चर्चेत आले. आर्यन खानला अटक केल्यानंतर वानखेडेंवर अनेक आरोप, टीका झाली. या सर्व प्रकरणात विशेष प्रकरण गाजतंय ते वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राचं. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांची नेमकी जात कोणती हा प्रश्न ऐरणीवर आला. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपण दलित असल्याचे वारंवार म्हटले आहे. तर नवाब मलिक यांनी मात्र वानखेडे मुस्लिमच असल्याचे ठामपणे सांगितले आहे. यासंदर्भात जात पडताळणी समितीसमोर सुनावणी सध्या सुरु आहे. (The next caste verification hearing in Sameer Wankhede case will be held on January 18)
इतर बातम्या
Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा