AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला, दोन-तीन महिन्यांपासून सतत फोनवरून देत होता धमकी…

गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटक सीमा प्रश्नाच्या वादावर शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना धमकी आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात होता.

शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला, दोन-तीन महिन्यांपासून सतत फोनवरून देत होता धमकी...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 12:59 PM

गोविंद ठाकूर, मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि मुंबईत आल्याचे सांगून देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलरने हिंदीत धमकी दिली आहे. धमकी दिल्यानंतर सध्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. हा गुन्हा आयपीसीच्या कलम २९४, ५०६(२) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई पोलीसांनी तक्रारीनंतर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. त्यामध्ये शरद पवार यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध लागला आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारमधील रहिवासी आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता.

बिहारमधून धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलीस लवकरच ताब्यात घेणार असून उद्यापर्यंत मुंबईत आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटक सीमा प्रश्नाच्या वादावर शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना धमकी आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात होता.

दरम्यान बिहार मधून फोन करणारा व्यक्ती कोण आहे. शरद पवार यांना का धमकी देत होता. शरद पवार यांचा आणि संबंधित व्यक्तीचा संबंध काय आहे अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहे.

त्यामूळे शरद पवार यांना धमकी आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून यापूर्वी संजय राऊत यांनाही धमकी आल्याची माहिती त्यांनी स्वतःच पत्रकारांना दिली होती.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.