तो रिक्षाचालक ती विधवा, दोघांचेही सूत जुळले; पण चारित्र्याच्या संशयावरून घेतला कानाचा चावा नि लागले इतके टाके
गेल्या दहा वर्षांपासून त्रास देत आहे. मला रिक्षात टाकून घेऊन जातो. झगडे सुरू आहेत. खोटे आरोप केले जातात.
सोलापूर : सोलापुरात एका व्यक्तीने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेतला. त्यात त्याने आपल्या पत्नीचा कान कापल्याची घटना समोर आलीय. सोलापुरातील नवीन विडी घरकुल परिसरात ही घटना घडलीय. यानंतर पीडित महिलेच्या आई आणि इतर नातेवाईकांनी तिला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत तिच्या कानावर उपचार केलेत. यामध्ये महिलेच्या कानाला काही टाके घालण्यात आल्याची माहिती समोर आलीय. आरीफा अकिल सय्यद असं या पीडित महिलेचे नाव आहे. संशयी पती अकील शकील सय्यद हा सध्या पसार आहे. पीडित महिलेने याविरोधात वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेहमी मारहाण करत असल्याचा आरोप
पीडित महिला आरिफा सय्यद ही विधवा होती. 2015 पासून ती अकिल सय्यदच्या संपर्कात आली. अकिल हा रिक्षा चालक आहे. अकिल हा देखील विवाहित होता. पहिली पत्नी असतानाही त्याने आरिफा सोबत 2019 मध्ये लग्न (निकाह) केले. लग्नापूर्वी आरिफा ही विधवा असताना अकिलने तिला चांगले नांदवण्याचे आश्वासन दिले होते. पण विवाहानंतर चारित्र्यावर संशय घेत घरगुती हिंसाचार सुरू केला. वाद विकोपाला जाऊन अकिल नेहमी मारझोड करत असल्याची माहिती पीडित महिलेने दिली आहे.
आरोपी झाला पसार
या प्रकरणी आरोपी अकील सय्यद याच्याविरोधात भा.द.वी. कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शकील हा पसार असून वळसंग पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी दिली. कौटुंबीक भांडण हे होतचं असते. पण, कानाचा चावा घेण्याच्या घटना फार कमी घडतात. या घटनेची चर्चा परिसरात सुरू आहे. पत्नीच्या कानाला टाके लागले. त्यामुळे तिला काही दिवस उपचाराची गरज आहे. आता या घटनेमुळे हे नातं किती दिवस टिकते काही सांगता येत नाही.
पीडित महिला म्हणते…
कानाला चावा घेतल्याने तीन टाके लागलेत. गेल्या दहा वर्षांपासून त्रास देत आहे. मला रिक्षात टाकून घेऊन जातो. झगडे सुरू आहेत. खोटे आरोप केले जातात. माझ्या मुलांना आणि आईवडिलांना मारण्याची धमकी देतो. मला घटस्फोट हवाय, असंही पीडित महिलेचं म्हणणं आहे. पोलीस माझं काय करणार, असा सांगत असल्याचं पीडित महिलेनं सांगितलं.