नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, संतापलेल्या मुलाचे आईसोबत धक्कादायक कृत्य

आई काम करत असलेल्या दुकानात येऊन मुलाने तिला हातोड्याने मारहाण केली. शहरातील मार्केटयार्ड येथील एका दुकानात ही घटना घडली आहे.

नवीन मोबाईल घेऊन दिला नाही, संतापलेल्या मुलाचे आईसोबत धक्कादायक कृत्य
मोबाईलसाठी मुलाचा आईवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 2:21 PM

अहमदनगर / कुणाल जायकर (प्रतिनिधी) : नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाने आईला हातोड्याने मारल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. आई काम करत असलेल्या दुकानात येऊन मुलाने तिला हातोड्याने मारहाण केली. शहरातील मार्केटयार्ड येथील एका दुकानात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आईने दिलेल्या फिर्यादीवरून मुलाविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. राज बाळासाहेब बोरगे असे 26 वर्षीय गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. मनिषा बाळासाहेब बोरगे असे हल्ला करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

नवीन मोबाईलसाठी आईकडे करत होता हट्ट

मनिषा या मार्केटयार्ड येथील एका इलेक्ट्रॉनिक दुकानात काम करतात. त्यांचा मुलगा राज हा त्यांना भेटण्यासाठी दुकानात आला. त्यावेळी त्याने मला नवीन मोबाईल घेऊन दे, असा आग्रह धरला.

आईने नकार दिल्याने हातोड्याने मारले

यावर आता पैसे नाहीत, तुला याआधीच मोबाईल दिला होता, आता तू घरी जा, असे सांगून मनिषा यांनी मुलाला समजावून सांगितले. मात्र मोबाईल घेऊन दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही, असे मुलाने सांगितले.

हे सुद्धा वाचा

यामुळे संतापलेल्या मुलाने चारित्र्यावर संशय घेत आईच्या पायावर हातोडा मारला. त्यानंतर दुकानातील स्टीलचा ग्लास आईच्या डोक्यात मारत आईला जखमी केले.

आईची कोतवाली पोलिसात तक्रार

यानंतर महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून, ती घरी एकटीच राहते. आरोपी मुलगा हा त्याच्या आजीकडे राहतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.