पुणे – पिंपरी चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) रावेत परिसरात भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने (Truck) रस्त्यावर पट्टे मारत असलेल्या कामगारांना उडवले. ही घटना पहाटेच्या सुमाराला रावेतच्या समीर लॉन्स जवळ घडली आहे. यामध्ये एक कामगार जागीच ठार झाला आहे. तर 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमी अपघात ग्रस्तांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार राजस्थानचे असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून रावेत पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत.
पहाटे रस्त्यावर पट्टे मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी चार कामगार आपलं काम करत होते. हे काम पिंपरी येथील रावेतच्या समीर लॉन्स जवळ सुरू होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तीन कामगारांना उडविले. त्यावेळी एका कामगाराचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. संबंधित ट्रकचा चालक तिथून पळून गेला असून पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. जखमी झालेल्या कामगारांवरती वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चार कामगार काम करीत होते. त्यावेळी ट्रकने उडविल्याने अपघातात साजीद खान (वय 25) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जबर जखमी झाले आहेत. संदीप कुमार, प्रल्हाद यादव, भोला कुमार, अनिल कुमार अशी जखमींची नावे आहेत. ह्या चारही जखमीच्या अंगावर पेंट सांडल्याने भाजून गंभीर जखमी झाले आहेत.
रस्त्याची काम करीत असलेल्या अनेकांचा लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वाहनाचा चालक दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सकाळी घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी आहे. आता राजस्थानमधील तरूणाचा मृतदेह त्याच्या मुळगावी नेणार की त्याचा अंतविधी इथचं करणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
कामगाराचे कुटुंबीय राजस्थानमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.