Wardha : वर्धा गर्भपात प्रकरणी आरोग्य विभागाकडून अद्याप तक्रार नाही, आरोग्य विभागाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह
बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावणे, रुग्णालयात अवैध गर्भपात करणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे यासह शासकीय रुग्णालयातील औषधं खाजगी रुग्णालयात आढळणे या संदर्भात आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीच तक्रार दाखल नाही.
वर्धा : आर्वीतील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी कारवाईच्या रडारवर असलेल्या कदम रुग्णालयावर चार दिवसांनंतरही आरोग्य विभागाकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नाही. पोलिसांकडून 13 तारखेला आर्वीच्या वैद्यकीय अधीक्षक यांना तक्रार दाखल करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. मात्र आरोग्य विभागाचा गेल्या चार दिवसांपासून केवळ तपासच सुरु आहे. पोलीस विभाग अद्यापही वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (The Wardha abortion case has not yet been reported by the health department)
आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी कदम रुग्णालयाच्या मागील बाजूस गॅस चेंबरमधून 12 कवट्या, 54 हाडे, शासकीय रुग्णालयाच्या मालाईन ड्रॅगचे 23 खोके त्यात एकूण 71 हजार 764 गोळ्या आढळल्या तर ऑक्सिटिन नामक 90 इंजेक्टशन, काही फाईल, रजिस्टर सुद्धा जप्त केली आहेत. तर घरातून पोलिसांनी काळवीटचे कातडे आणि 35 हजार रुपये जप्त केले आहेत.
आरोग्य अधिकाऱ्यांचा याबाबत बोलण्यास नकार
लैंगिक अत्याचारासह गर्भपात प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. मात्र रुग्णालयात चालणाऱ्या गैरकारभारासंदर्भात आरोग्य विभागाची कोणतीही तक्रार नाही. बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट न लावणे, रुग्णालयात अवैध गर्भपात करणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे यासह शासकीय रुग्णालयातील औषधं खाजगी रुग्णालयात आढळणे या संदर्भात आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीच तक्रार दाखल नाही. वैद्यकीय विभागाच्या ढिम्मपणामुळे अवैध कामाला खतपाणी मिळत असल्याची चर्चा आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.
अटक डॉक्टर नीरज कदम आर्वी उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर
या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. याप्रकरणी अटक केलेले डॉक्टर नीरज कदम हे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. कदम रुग्णालयच्या तपासणीदरम्यान सरकारी दवाखान्यात वापरण्यात येणारे औषधी आढळल्याने आता या आर्वी येथील आरोग्य विभागसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
(The Wardha abortion case has not yet been reported by the health department)
इतर बातम्या
भयंकर! अकरा वर्षांच्या मुलाचा 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, नांदेडमधील घटनेने खळबळ