Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!

औरंगाबादः सोशल मीडियावरून (Misuse of Social Media) एका तरुणाचा मोबाइल नंबर मिळवून त्याला बोलण्यात अडकवून आणि नंतर धमकावून लुटण्याचा प्रयत्न एका तरुणीने केल्याचे औरंगाबादमध्ये (Aurangabad crime) उघड झाले आहे. जवाहरनगर पोलिस (Aurangabad Police) ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार ऐकून अनेकांनी सोशल मीडियावर स्वतःची माहिती टाकणे कितपत गंभीर ठरू शकते, यावर विचार करायला हवा. शनिवारी रात्री […]

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!
बोलण्यात गुंतवून तरुणाला फसवण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 10:52 AM

औरंगाबादः सोशल मीडियावरून (Misuse of Social Media) एका तरुणाचा मोबाइल नंबर मिळवून त्याला बोलण्यात अडकवून आणि नंतर धमकावून लुटण्याचा प्रयत्न एका तरुणीने केल्याचे औरंगाबादमध्ये (Aurangabad crime) उघड झाले आहे. जवाहरनगर पोलिस (Aurangabad Police) ठाण्याच्या हद्दीत घडलेला हा प्रकार ऐकून अनेकांनी सोशल मीडियावर स्वतःची माहिती टाकणे कितपत गंभीर ठरू शकते, यावर विचार करायला हवा.

शनिवारी रात्री बोलण्यातून अडकवले

शनिवारी रात्री सदर तरुणीने पुण्याला जाण्यासाठी बीड बायपास परिसरातून जस्ट डायलद्वारे ट्रॅव्हल्स एजन्सीचे फोन क्रमांक मिळलवले. त्यापैकी तिने खिवंसरा पार्क येथील एका ट्रॅव्हल्स एजन्सीशी 18 नोव्हेंबर रोजी संपर्क साधला. तेथे तिकिट बुकिंग करणाऱ्या तरुणाला तिने पुण्याला जाण्यासाठीच्या बसची विचारपूस केली. त्यावर तरुणाने 850 रुपये भाडे सांगितले. पैसे कमी करण्यावरून तरुणीने संभाषणाला सुरुवात केली. नंतर तिकिट 750 रुपयात देण्याचे ठरले. हे संभाषण चाळीस मिनिटे सुरु होते. यात दोघेही थेट अश्लीलतेकडे वळले. तिकिटाच्या बुकिंगनंतर तरुणाने त्याच दिवशी रात्री तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. मीसुद्धा तुझ्यासोबत पुण्याला येतो, आपण सोबत प्रवास करू, असे सुरेश म्हणाला. हे सर्व ऐकून तरुणीने 19 नोव्हेंबरला सकाळी तरुणाला फोन करून, आपण सोबत जाऊ आणि अश्लील संवाद का केला, असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली. आधी माझी माफी माग असा तगादा लावला.

माफी मागितली, तिकिटाचे पैसेही भरले..

तरुणीने जास्तच वाद घालायला सुरुवात केल्यावर तरुणाने तिची माफी मागितली. तिकिटाचे पैसेही मीच भरतो म्हणत, तिच्यासोबत बोलणे टाळले. मात्र अश्लील बोलण्यामुळे मी पोलिसात तक्रार देणार असल्याचे सांगत ट्रॅव्हल्स एजन्सीत गोंधळ घालायला सुरुवात केली. एजन्सीतील तरुणांच्या तक्रारीनंतर जवाहरनगर पोलिसांनी तेथे धाव घेतली. मात्र तक्रार नको असेल तर एक लाख रुपये मिळवून द्या, अशी धमकी सदर तरुणीने दिली. पोलिसांनी तिला ठाण्यात येऊन तक्रार दे म्हटले तेव्हा तरुणी तेथून निघून गेली.

‘सोशल मीडियावरील संभाषण जपून करा’

हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील संभाषण जपून करण्याचे आवाहन केले आहे. अनेक महिला फेसबुकवरील माहितीत शहरातच राहत असल्याचे दाखवत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यांची रिक्वेस्ट मान्य केल्यावर लगेचच काही सेकंदात फेसबुक मेसेंजरवर मेसेज पाठवतात. या मेसेजला उत्तर दिल्यानंतर व्हॉट्सअप क्रमांकाची मागणी केली जाते. त्यानंतर चॅटिंग, अश्लील चॅटिंग होते. अशा चॅटिंगमध्ये गुरफटलेल्या तरुणांच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. मात्र भीतीपोटी अनेक पुरुष गुन्हा दाखल करत नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या-

लसीकरणाचे नियम डावलले, औरंगाबादमध्ये बाबा पेट्रोल पंप सील, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

एकविरेच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात, तिघा भाविकांचा मृत्यू, चिमुकल्यांसह 9 जण गंभीर

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.