Video : पनवेलच्या वाघेज पावभाजी सेंटरमध्ये चोर, सीसीटीव्ही असतानाही कसा डल्ला मारला? पाहा
आता तर चक्क पावभाजी सेंटरमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आल्याने चोरांना पोलिसांचा (Police) धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे. पनवेल शहरातील वाघेज पावभाजी सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये घुसून रोख रक्कमेसह इतर ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
रायगड : पनवेल शहरात सध्या चोरांचा (thief) सुळसुळाट झाला आहे. चोरीच्या अनेक घटना घडत असल्याने दुकानदार (Shops) आणि सर्वसामान्य हैराण झाले आहेत. आता तर चक्क पावभाजी सेंटरमध्ये चोरी झाल्याची घटना समोर आल्याने चोरांना पोलिसांचा (Police) धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे. पनवेल शहरातील वाघेज पावभाजी सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये घुसून रोख रक्कमेसह इतर ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. वाघेज पावभाजी सेंटर हे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून आतमध्ये असलेली रोख रक्कम व इतर ऐवज चोरुन नेला आहे. यावेळी त्यांच्या हालचाली सीसीटीव्हीकैद झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेने खळबळ माजली आहे. दुकानदार आणि व्यवसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने निर्माण झाला आहे.
सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद
पनवेलमध्ये चोरी सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/vpgYMyi9pJ
— Abhishek karande (@Abhishekkaran16) February 25, 2022
आजकाल सगळीकडे सीसीटीव्ही हा तिसऱ्या डोळ्याचे काम करत असल्याने सहसा चोर यापासून वाचत नाहीत. हे चोरही सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांना यांचा शोध घेणे सोपो जाणार आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या चोरांचा शोध सुरू केला आहे. मात्र चोरांच्या या धाडसी चोरीने हॉटेल व्यवसायिक पुन्हा एकदा हादरून गेले आहेत. तर दुसरीकडे सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या होत असल्याने पोलीसही हैराण झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्या थांबवण्याचे आणि या चोरांना पकडण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर असणार आहे. गेल्या अनेक दिवसात चोरीच्या अशा अनेक घटना घडल्या आहे.
चोरीच्या घटना वाढल्या
या परिसरात छोट्या धंद्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण दुकान बंद झाले तरी पैसे गल्ल्यातच ठेवतात. चोरांनी हेच हेरून ही चोरी केली आहे. त्यामुळे दुकानदारांनीही आता योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात वाढलेल्या चोरीच्या घटाना पोलिसांसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहेत. तर अशा चोऱ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण आहे. या चोरांना लवकरात लवकर अटक करावी आणि आमचा मुद्देमाल परत मिळावा असी अपेक्षा व्यवसायिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस आता या चोरांच्या मागावर आहेत. हे चोर पोलिसांच्या हाती कधी लागताहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.