पुणे – भोर (bhor) तालुक्यात मागच्या तीन दिवसांपासून आत्महत्येचं (Suicide) सत्र सुरू आहे. पोलिसांनी (bhor police) दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह सापडल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यामध्ये तिघांचा स्वत:हून आत्महत्या केली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मृतदेहांपैकी दोन मृतांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर अद्याप दोन मृतदेहाची ओळख पटलेली नाही. चार वेगळ्या ठिकाणी आत्महत्या झाल्याने भोर तालुक्यात खळबळ माजली आहे. झालेल्या खरंच आत्महत्या आहेत की हत्या आहेत असा अनेकांना प्रश्न पडला आहे. भोर पोलिस या चारही प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. विशेष म्हणजे तीनपैकी एक मृतदेह संशयास्पद आहे. कसून चौकशी केल्यानंतर ते प्रकऱण सुध्दा उजेडात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
भोर तालुक्यात कुठे केल्या आहेत आत्महत्या
पुण्यातील भोर तालुक्यात सलग तीन दिवसात 4 ठिकाणी मृतदेह आढळून आलेत, यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष मृतदेहांचा समावेश आहे. दोन महिलांचे मृतदेह नीरा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरंगताना आढळून आलेत. तर एका पुरुषाचा मृतदेह भोर शहरालगत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दुसऱ्या पुरुषाचा मृतदेह पुणे-महाड मार्गावरील 200 फूट खोल दरीत आढळून आलाय.यापैकी दोघांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय, तर इतर दोघांची माहिती मिळवण्याचं कामं सुरू आहे. दरम्यान यात तिघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. चारही मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. भोर पोलिस स्टेशन या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे.
पोलिस कसून चौकशी करणार
चार विविध घटना विविध ठिकाणी एकाच तालुक्यात झाल्याने पोलिस सुध्दा चक्रावून गेले आहेत. तसेच भोर तालुक्यात सुध्दा खळबळ माजली आहे. अनेक लोकांनी शंका व्यक्त केली आहे. मृतदेहांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पोलिस तपासाची दिशा ठरवतील. त्याप्रमाणे पुढील तपास होईल. अद्याप दोन मृतदेहांची ओळख पटली नसून ती पटवण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत.