रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून पळायचे, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकीवरुन यायचे आणि मोबाईल हिसकावून पळायचे. पोलिसांनी वेगाने तपासचक्रं फिरवली आणि आरोपींना जेरबंद करण्यास यश आले आहे.

रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून पळायचे, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात
मोबाईल हिसकावणारी दुकली जेरबंदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 9:01 AM

मुंबई : रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या आरोपींच्या बोरिवली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही चोरट्यांना हैदराबाद येथून बेड्या ठोकल्या आहेत. आरिफ मोहम्मद युसूफ शेख आणि इरफान अक्रम खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून आयफोन 13 प्रो आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर 200 दुचाकीही जप्त केली आहे. इरफान अक्रम खानवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी मुंबईत आणखी किती मोबाईल हिसकावून घेतले आहेत, याचा तपास सध्या बोरिवली पोलीस करत आहेत.

तरुणाच्या फिर्यादीनंतर आरोपींचा शोध सुरु

दोघेही चोरटे दुचाकीवरुन यायचे आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल खेचून पसार व्हायचे. बोरिवलीतील सुमेर नगरमध्ये 9 मे रोजी रात्री 10 वाजता हे दोन्ही आरोपी दुचाकीवर आले. यावेळी मोबाईलवर बोलत असलेल्या 25 वर्षीय तरुणाकडून आयफोन 13 प्रो मोबाईल हिसकावून पळून गेले. तरुणाने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेत मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटक

तक्रार दाखल होताच बोरिवली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या हैदराबाद येथील ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांच्या पथकाने हैदराबादला जाऊन दोन्ही आरोपींना अटक करून मुंबईत आणले. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

नालासोपाऱ्यात चैन स्नॅचरला अटक

वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून फरार होणाऱ्या सराईत आरोपीला विरार पोलिसांनी अटक केली आहे. सोनसाखळी चोरताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. विरार गुन्हे शाखा कक्ष 2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या टीमने कारवाई केली. अटक आरोपीने अर्नाळा, तुळिंज, विरार पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्याची कबुली दिली आहे. शाहिद अब्दुल सत्तार कापडिया असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.