केवढे हे क्रौर्य…देवाघरच्या फुलावर कट्यारीचे वार, नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी गंभीर जखमी, लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न

मुले ही देवाघरची फुले असतात, असे म्हणतात खरं. मात्र, अशी वाक्ये पुस्तकातच शोभून दिसतात. कारण वास्तव भयाण आणि क्रूरही असते. त्याला सामोरे जाताना आपल्या जीवाचा थरकाप उडतो. मग परिस्थिती अशी उद्भवते की, अनेकजण या देवाघरच्या फुलाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पहात नाहीत. नेमकी अशीच घटना नाशिकमध्ये घडली.

केवढे हे क्रौर्य...देवाघरच्या फुलावर कट्यारीचे वार, नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी गंभीर जखमी, लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न
नाशिकमध्ये चोरट्याने चार वर्षांच्या मुलीवर कट्यारीने वार केले.
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 5:33 PM

नाशिकः मुले ही देवाघरची फुले असतात, असे म्हणतात खरं. मात्र, अशी वाक्ये पुस्तकातच शोभून दिसतात. कारण वास्तव भयाण आणि क्रूरही असते. त्याला सामोरे जाताना आपल्या जीवाचा थरकाप उडतो. मग परिस्थिती अशी उद्भवते की, अनेकजण या देवाघरच्या फुलाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पहात नाहीत. नेमकी अशीच घटना नाशिकमध्ये घडली. त्यात एका चोरट्याने चक्क 4 वर्षांच्या लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला तेव्हा त्याने तिच्या हातावर चक्क कट्यारीने वार केला. या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे.

नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. घरफोड्या आणि जबरी चोरीचे गुन्हे नित्याचे झाले आहेत. त्यात धनेधर टोळीच्या 17 जणांना मोक्का लावण्याची कारवाई पोलीस आयुक्तांनी केली. मात्र, गुन्हे सत्र इतके वाढले आहे की, घराघरातील लहान मुलेही असुरक्षित झाल्याचे दिसते आहे. याचाचा आरसा दाखवणारी घटना सिडकोमध्ये घडली. सानवी पगारे ही अवघ्या 4 वर्षांची मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. तिची दंगामस्ती, खोड्या सुरू होत्या. मात्र, अचानक एका व्यक्तीने तिला जवळ बोलावले. ती विश्वासाने संबंधिताकडे गेली देखील. मात्र, त्याचा हेतू काही औरच होता. त्याने चक्क तिच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मुलीने स्वाभिकपणे विरोध केला. मात्र, समोरच्या चोरट्याने सोबतची कट्यार काढली. आणि तिच्या हातावर वार केले. त्यामुळे मुलगी किंचाळली. तिचा आक्रोश पाहून चोरट्याने पोबारा केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मुलीच्या आईने हाय खाल्लीय, तर सिडकोतील नागरिकही भयभीत झालेत.

कारवाईची मागणी

नाशिकमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. उपनगर, जेलरोड, नाशिकरोड या भागात व्यावसायिकांकडून खंडणी वसुली करणे, शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी, मारहाण करणे, लुटणे असे तब्बल 46 स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील 17 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना एकीकडे दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे चक्क चार वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इतर बातम्याः

Nashik| 100 कोटींचा TDR Scam; महाालिका आयुक्तांकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत, ऐन निवडणुकीत धुरळा!

5 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा उपअधीक्षक चतुर्भुज; नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.