Crime News : चोरट्यांची हॅट्रिक, स्टेट बँकेचे एटीएम फोडून रोकड पळविली, पोलिस चर्चेत
तिसऱ्यांदा एटीएम फोडल्यामुळे चोरट्यांची हॅट्रिक, परिसरात चर्चेला उधाण, पोलिसांची चिंता वाढली
नाशिक – जिल्ह्यात स्टेट बँकेचे एटीएम (ATM) तीनवेळा एकचं एटीएम फोडल्यामुळे चोरटे चांगलेचं चर्चेत आले आहेत. नाशिक जिल्ह्यात (Nashik Crime News) सगळीकडे चर्चा सुरु झाल्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे. तिसऱ्यांदा एटीएम फोडल्यामुळे चोरट्यांनी हॅट्रीक केली अशी चर्चा आहे. नाशिकच्या सटाणा शहरात (Nashik Satana City) गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल 13 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
चोरीच्या घटनेने सटाणा शहरात त्यामुळे खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उचलला असताना या धाडसी चोरीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत हे एटीएम फोडण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी त्याच एटीएममधून पहिल्यांदा चोवीस लाख व नंतरचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
चोरीची घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास येथील मालेगाव रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात घडली आहे. रात्रीच्या वेळेस पोलिस ज्यावेळी घस्त घालत होते. त्यावेळी स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याची घटना त्यांच्या लक्षात आली.
चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये चोरी केली आहे. चोरी करण्याच्या आगोदर सायरन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या संबंधित वायर कापल्या. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 13 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला.