चोरांची अशीही दर्यादिली… इंजीनिअरच्या घरात फुटकी कवडी सापडली नाही, स्वत:च 500 रुपयांची नोट ठेवून गेले; कुठे घडला हा अजब प्रकार ?

मोठं घबाड हाती लागेल या आशेने चोरटे चोरीसाठी एका घरात घुसले खरे मात्र तेथे त्यांना चोरी करण्यासारखं काही सामानच मिळालं नाही. सगळ घर धुंडाळूनही त्यांना काहीच मौल्यवान वस्तू न सापडल्याने चोरांनी अखेर...

चोरांची अशीही दर्यादिली... इंजीनिअरच्या घरात फुटकी कवडी सापडली नाही, स्वत:च 500 रुपयांची नोट ठेवून गेले; कुठे घडला हा अजब प्रकार ?
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 10:06 AM

नवी दिल्ली | 24 जुलै 2023 : आजकाल चोरीच्या घटना खूप वाढल्या आहेत. राजधानीतही चोरीची (theft cases) प्रकरणे खूप वाढलेली दिसत आहेत. मात्र तेथे एक अडब घटनाही पहायला मिळाली. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरांची भलतीच निराशा झाला. त्यांना चोरण्यासारखं काहीच मौल्यवान सामान सापडलं नाही. म्हणून चोरांनीच दर्यादिली दाखवत त्या घरात थोडे (thieves kept money) पैसे ठेवले आणि ते निघून गेले.

राजधानी दिल्लीत हा अजब-गजब किस्सा घडला आहे. रोहिणी भागात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या घरात काही चोर घुसले होते. मात्र तेथे त्यांना चोरी करण्यासारखं काहीच सामान सापडल नाही. म्हणून दु:खी होऊन ते चोर स्वत:कडचे ५०० रुपयेच त्या इसमाच्या घरात ठेवून निघून गेले. चोरांचा हा अजब कारनामा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

नॉर्थ रोहिणी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना 19 जुलै रोजी सकाळी 8च्या सुमारास रोहिणी सेक्टर 8 मध्ये चोरी झाल्याची सूचना मिळाली होती. रिपोर्ट्सनुसार, तक्रार दाखल करणारा इसम आणि त्याची पत्नी , गुडगाव येथे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. तेवढ्यात त्यांना शेजाऱ्यांचा फोन आला व तुमच्या घरात चोरी झाली आगे असे त्यांना सागण्यात आले. ते तातडीने घरी पोहोचले असता घराच्या मेन गेटचं कुलूप तुटलेलं दिसलं, मात्र त्यांच्या घरात कोणतंही मैल्यवान सामान नव्हतं, घरातील कपाटंही व्यवस्थित होती. हैराण करणारी एक गोष्ट म्हणजे, घटनास्थळी त्यांना 500 रुपयांची एक नोट सापडली.

माल न मिळाल्याने यापूर्वीही चोरांनी एका दांपत्याला दिली होती रक्कम

ही घटना मागील जूनमध्ये घडलेल्या घटनेसारखीच आहे. तेव्हा दोन दरोडेखोरांनी एका जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांच्याकडे केवळ 20 रुपयेच सापडले होते. पूर्व दिल्लीतील शाहदरा येथील बाजार परिसरातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि सोशल मीडियावरही बरीच व्हायरल झाली होती. त्या दांपत्याकडे काहीच मौल्यवान सामान न मिळाल्याने दरोडेखोर निराश झाले होते. त्यापैकी एकानेच घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्या जोडप्याला 00 रुपयांची नोट दिली. त्यानंतर पोलिसांनी किमान 200 कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करून दोन्ही दरोडेखोरांना अटक केली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.