कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते आरोपी, तितक्यात…
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागातच विकण्याची ते काळजी घेत होते. मात्र एका कारखान्यावर दरोडा टाकण्याची हाव चोरांना महागात पडली. यामुळे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यास पालघर पोलिसांना यश आले आहे.
पालघर / मोहम्मद हुसैन : कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. आरोपींना अटक केल्यानंतर पालघर जिल्ह्यात दुचाकी चोरींचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तारापूर एमआयडीसीमधील एका कारखान्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी चोरट्यांना बेड्या ठोकल्या. पोलीस चौकशीत या चोरांनी 38 दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. शहापूर आणि जव्हार तालुक्याच्या दुर्गम भागात राहणार्या या चोरांनी केवळ मौजमजेसाठी झटपट पैसा हवा म्हणून दुचाकी चोरीचा गोरखधंदा सुरू केला होता.
झटपट जास्त पैसा कमावण्याची हाव महागात पडली
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागातच विकण्याची ते काळजी घेत होते. मात्र एका कारखान्यावर दरोडा टाकण्याची हाव चोरांना महागात पडली. यामुळे दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यास पालघर पोलिसांना यश आले आहे. राम सखाराम काकड, गुरुनाथ पांडुरंग झुगरे आणि नितेश संजय मोडक अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत.
हिंगोलीत चारचाकी चोरांची टोळी सक्रिय
हिंगोली जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नाही. जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, वाहन पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे घरफोडी मोटारसायकल चोऱ्यांनंतर आता चारचाकी वाहन चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका कृषी केंद्रासमोर लावलेला साडे पाच लाख रुपये किंमतीचा बोलोरो पीकअप चोरट्यांनी पळवल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
879691