अॅपवरील मैत्री महागात पडली, मित्राला भेटायला गेला अन्…

एका अॅपद्वारे त्या दोघांची मैत्री झाली. मग दोघा मित्रांचे भेटायचे ठरले. त्याप्रमाणे एकाच्या घरी दोघे भेटले. मग पुढे भलतंच घडलं.

अॅपवरील मैत्री महागात पडली, मित्राला भेटायला गेला अन्...
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाकडे पैशाची मागणीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 5:31 PM

संदिप वानखेडे, TV9 मराठी, बुलढाणा : सोशल मीडियावर मैत्री करणे आणि नको त्या लफड्यात फसल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यामुळे अनेकदा भयंकर घटनाही घडतात. मात्र तरीही हल्लीची पिढी सोशल मीडियाचा नाद सोडत नाही. सोशल मीडिया अॅपमुळे एक धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. चिखली येथील एका 24 वर्षीय शिक्षकाला ट्रॅपमध्ये अडकवून युवकासोबत समलिंगी लैंगिक संबंध ठेवत असल्याचा व्हीडिओ काढला. मग शिक्षकाकडे 4 लाखाची मागणी करत मारहाण करण्यात आली. शिक्षकाकडून 10 हजार रुपये बळजबरीने घेण्यात आल्याची घटना बुलडाणा शहरातील गोडे कृषी कॉलेजजवळ घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी

चिखली येथील फिर्यादी शिक्षक विवेक सखाराम ढोकणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्याची मैत्री एका अॅपद्वारे बुलडाणा येथील ऋषीकेश सोबत झाली. तो बुलडाणा येथील गोडे कृषी कॉलेज जवळ ऋषिकेशच्या घरी त्याच्यासोबत नको त्या अवस्थेत असताना आरोपींनी व्हिडोओ काढला. यानंतर विवेक ढोकणे याच्याकडे चार लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. सोबतच त्याला मारहाण देखील करण्यात आली.

दोन आरोपींना अटक

मात्र तेवढ्यात आरोपीमधील एका 25 वर्षीय युवतीने मध्यस्थी करून त्याच्याकडे एवढी रक्कम नाही तो थोडेफार देऊ शकतो असे सांगून त्याला घेऊन ATM मध्ये गेले. मग त्याच्याकडून दहा हजार रुपये काढून घेतले. अशा तक्रारीवरून बुलढाणा येथील आरोपी ऋषिकेश, संतोष, रुपेश आणि एक तरुणी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाणा शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश आणि संतोष जाधव या दोघांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.