Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी; बंगळूरूमधून एकाला अटक
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 9:05 AM

मुंबई : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीने खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणात पोलिसांनी बंगळूरूमधून एका 34 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आरोपीने ही धमकी पाठवली होती. व्हॉट्सअ‍ॅपवर लिहिलेल्या संदेशामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचे म्हटले होते.

आठ डिसेंबरला आला पहिला धमकीचा संदेश

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने सर्वप्रमथ आठ डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पहिला मॅसेज पाठवला होता. या मॅसेजवर ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप आरोपीने आपल्या मॅसेजमध्ये केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी या मॅसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना दूरध्वनीवरून तिनदा कॉल केले. आदित्य यांनी ते कॉल स्वीकारले नाही. कॉल स्वीकारले नसल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीला अटक

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेऱ बंगळूरुमधून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सायबर पोलिसांनी तात्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला बड्या ठोकल्या.

संबंधित बातम्या

स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका; धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला

Muslim Reservation : 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा पाठपुरावा करा, नसीम खान यांचं बाळासाहेब थोरातांना पत्र

शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.