Solapur Drowned Death : सोलापूरमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू

शेटफळमधील गोरख डोंगरे यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले आहे. या शेततळ्यात गावातील तीन शाळकरी मुले दुपारच्या सत्रात पोहण्यासाठी गेली होती. गावातील तांबट समाजातील ही तीनही मुले होती. मात्र शेततळ्यात उतरल्यानंतर त्यातील दोघांना पोहता येत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Solapur Drowned Death : सोलापूरमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू
सोलापूरमध्ये शेततळ्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 10:29 PM

सोलापूर : शेततळ्यात बुडून 3 बालकां (Children)चा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील शेटफळ या गावात घडली आहे. शेटफळमधील देवीचा माळ परिसरात ही घटना घडली. विनायक भरत निकम (8), सिध्दार्थ भरत निकम (7) आणि कार्तिक मुकेश हिंगमीरे (7) अशी मयत चिमुकल्यांची नावे आहेत. शेततळ्यात पोहण्या (Swimming)साठी गेली असता ही घटना घडली. मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. मयत बालकं तांबटकरी समाजातील होती. या शेततळ्याला तारेचे कुंपण नसल्याची माहिती समोर येत आहे.

पोहता येत नसल्यामुळे बुडाली मुले

शेटफळमधील गोरख डोंगरे यांच्या शेतात मोठे शेततळे बांधलेले आहे. या शेततळ्यात गावातील तीन शाळकरी मुले दुपारच्या सत्रात पोहण्यासाठी गेली होती. गावातील तांबट समाजातील ही तीनही मुले होती. मात्र शेततळ्यात उतरल्यानंतर त्यातील दोघांना पोहता येत नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विनायक निकम (8), सिध्दार्थ निकम (7) आणि कार्तिक हिंगमिरे (7) हे तिघे शेततळ्यात उतरले. मात्र यातील दोघांना पोहता येत नसल्याने दोघांनी एकाला पकडल्याने तिघेही बुडाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.

यामध्ये मुकेश हिंगमिरे हे मुळचे शेटफळ गावाचे रहिवासी आहेत. तर त्यांचे भावजी भरत निकम हे देखील माचणूर या गावातून मेव्हणे मुकेश हिंगमिरे यांच्याकडे स्थायिक झाले होते. दरम्यान त्यांचा तांबटाचा व्यवसाय आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास या दोन्ही कुटुंबातील मुले शेततळ्यात पोहण्यासाठी गेले आणि त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर या तीनही मुलांना जवळच्या खासगी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र तेथून त्यांना मोहोळ येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांकडू देण्यात आली. दरम्यान या घटनेची नोंद मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.