Nagpur Accident CCTV : दहेगाव फाट्यावर अंगावर काटा आणणारा अपघात! तिघेही बचावले, दोघांची प्रकृती गंभीर

सुदैवाने या अपघातात तिघांचेही जीव वाचले आहेत. मात्र,दोघांची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कार चालकाचा शोध सुरू आहे.

Nagpur Accident CCTV : दहेगाव फाट्यावर अंगावर काटा आणणारा अपघात! तिघेही बचावले, दोघांची प्रकृती गंभीर
नागपुरातील अंगावर काटा आणणारा अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 6:47 PM

नागपूर : राज्यातच नव्हे तर देशात रस्ते अपघातात जीव जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली होती. दरम्यान, रस्ते अपघात रोखण्याचं आव्हान संपूर्ण देशात कायम असल्याचं पाहायला मिळतंय. अपघाताचा एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणार व्हिडीओ नागपुरातून (Nagpur Road Accident Live Video) समोर आला आहे. या अपघातात एका कारनं बाईकला धडक दिली. तिघांना कारनं चिरडलं. मात्र सुदैवानं या अपघातात तिघेही जण बचावलेत. या अपघातातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. सध्या फरार कार चालकाचा शोध सुरु आहे. या भीषण अपघाताचं थराराक सीसीटीव्हीही (Accident CCTV) समोर आलंय.

नेमकं घडलं काय?

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दिसते आहे. एकजण सायकलवरुन येताना दिसतो. मात्र अचानक एक बाईक आडवी पडलेल्या अवस्थेत रस्त्यावर घसटताना दिसते.

बाईकसह तिघांना फरफटत नेलं

इतक्यात एक काळ्या रंगाची कारही मागून येताना दिसते. ही भरधाव वेगानं येणारी ही या बाईकला ठोकर देत पुढे फरफटक नेत असल्याचं दिसून येतं. दरम्यान, कार रस्ता पार करुन पुढे जाते. यावेळी तिघेजण या अपघातात चिरडले गेल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून आलं आहे.

भरधाव कार रस्त्याच्या मधोमध बाईक आणि तिघांना फरफटत नेते. यात तिघेही जण रस्त्यावरुन घासले जातात. तर कारचालकाचं कारवरील नियंत्रणही पूर्णपणे सुटल्याचं दिसून आलं आहे. या अपघातावेळचा संपूर्ण दरार रस्त्याशेजारी लागलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पाहा थरारक घटनेचा व्हिडीओ :

तिघेही बचावले पण…

या भीषण अपघातातून बचावलेल्या तिघांनीही याची देही याची डोळा मृत्यू अनुभवलाय. सुदैवानं या अपघातातून तिघेही जण बालंबाल बचावले आहेत. दरम्यान, या अपघातातील तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

या अपघातानंतर भरधाव कारच्या चालकानं घटनास्थळावरुन पळ काढलाय. या अपघाताची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरु असून फरार कारचालकाचा शोधही सुरु आहे.

नागपुरातील इतर महत्त्वाच्या बातम्या :

तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

आकाशातून पडले होते आगीचे गोळे, इस्रोचे शास्त्रज्ञ चंद्रपूर जिल्ह्यात दाखल; तपासणीसाठी ताब्यात घेतल्या वस्तू

Vidarbha Temperature | 11 पैकी 7 दिवस देशात सर्वाधिक तापमान चंद्रपूर, अकोल्यात; विदर्भात 11 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटा

पाहा Video | महत्त्वाची बातमी : पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांची धडक आणि गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.