महाराष्ट्र हादरला ! शिकाऊ डॉक्टरची हत्या, महाविद्यालयातच आढळला मृतदेह

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली असून त्याचे नाव डॉ. अशोक पाल असे आहे.

महाराष्ट्र हादरला ! शिकाऊ डॉक्टरची हत्या, महाविद्यालयातच आढळला मृतदेह
महिलेचा शेजाऱ्यावर जीव जडला, मग प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 7:05 AM

यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली असून त्याचे नाव डॉ. अशोक पाल असे आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ही हत्या करण्यात आलीय. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.

महाविद्यालयाच्या परिसरातच हत्या

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्यांची अमानुषपणे हत्या झाली. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला. या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरु केलाय.

महाविद्यालय प्रशासन, डीनविरोधात घोषणाबाजी 

शिकाऊ डॉक्टरची हत्या का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं असून राज्यत एकच खळबळ उडाली आहे. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्न विचारला जात आहे.

आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एकाद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला होता. स्वप्नील शिंदे असं या मयत डॉक्टरचं नाव होतं.  मृत विद्यार्थी डॉक्टर स्वप्नील शिंदे याने याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचारदेखील सुरु होते. तर दुसरीकडे आमच्या मुलाचा मृत्यू हा रॅगिंगमुळेच झाला आहे, असा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणामध्ये एक सुसाईड नोटदेखील आढळून आली होती. सुसाईड नोटमध्ये मला काही वरिष्ठ मुलींचा त्रास होता मयत डॉक्टरने नमूद केलं होतं.

इतर बातम्या :

भारतात पेट्रोल कार इतक्‍याच स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार, काय आहे नितीन गडकरींचा प्लान?

13 वर्षीय रिक्षावाल्याबरोबर 47 लाख घेऊन पळाली करोडपतीची पत्नी, 26 दिवसांनी परतली

धक्कादायक! बळजबरीने दारू पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार अन् खुनाचा प्रयत्न

(trainee doctor murdered in Yavatmal Vasantrao Naik Government Medical College)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.