‘नको त्या अवस्थेत’ तरुण-तरुणी सापडली, गावकऱ्यांचा कडक नियम सोशल मीडियावर व्हायरल
viral news : आदिवासी समाजातील तरुणी आणि तरुणी नको त्या अवस्थेत सापडल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना शिक्षा दिली आहे. गावकऱ्यांचा कडक नियम सोशल मीडियावर चांगलाचं चर्चेत आला आहे.
झारखंड : हे प्रकरण झारखंड (Jharkhand) राज्यातील आहे, तिथल्या एका तरुण आणि तरुणीला गावकऱ्यांनी शिक्षा दिली. त्याची सगळीकडं चर्चा सुरु झाली आहे. ज्यावेळी नको त्या अवस्थेत तरुण आणि तरुणी सापडली. त्यावेळी त्या दोघांच्या डोक्यावरील केस गावकऱ्यांनी कापले. त्याचबरोबर त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. हा सगळा प्रकार गावातील (Jharkhand crime news) एका व्यक्तीनं पोलिसांच्या कानावर घातला. त्याचबरोबर त्या दोघांना रात्रभर बांधून ठेवलं होतं अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दोघांची सुटका केली. ज्या महिलेने पोलिसांकडे (police) तक्रार केली. तिच्या सांगण्यावरुन तिथल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर गावातील ज्या लोकांनी त्या घृणास्पद वागणूक दिली अशा लोकांना सुध्दा ताब्यात घेतले आहे.
खरंतर हे प्रकरण साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट पोलिस स्टेशन अंतर्गत येत आहे. आदिवासी लोकं तिथं राहतात. ज्यावेळी तरुण आणि तरुणी लोकांना नको त्या अवस्थेत सापडले. त्यावेळी त्या गावची प्रथा त्या दोघांनी मोडली असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्या गावकऱ्यांनी लोकांना मारहाण केली आहे, त्याचबरोबर त्यांचं मुंडन सुध्दा केलं. रात्रभर त्यांना बांधून ठेवल्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली होती. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस तिथं दाखल झाल्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तरुणीने पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर गावातील रामा पहाड़िया, गुहिया पहाड़िया, राम पहाड़िया , मारकुश पहाड़िया , कुदरूम पहाड़िया यांच्यासोबत ९ गावकऱ्यांना देखील ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी घाणेरडं कृत्य केलेल्या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर अन्य लोकांना सुध्दा ताब्यात घेतलं आहे. पोलिस अजून काही आरोपीच्या शोधात असल्याची माहिती मिळाली आहे.