खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?

मयत तरुणाने दोन वर्षांपूर्वी आरोपी तरुणीशी कोर्ट मॅरेजही केले होते, मात्र याविषयी कोणालाही माहिती नव्हती.

खुर्चीत बसून शारीरिक संबंधात तरुणाला गळफास, अटकेतील तरुणी प्रेयसी नव्हे, पत्नी?
गुन्हेगारी वृत्त
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 2:44 PM

नागपूर : पॉर्न फिल्म पाहून वेगवेगळ्या सेक्स पोझिशन करुन बघण्याच्या नादात नागपुरात तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. मयत तरुणाचे आरोपी तरुणीसोबत कोर्ट मॅरेज झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर तरुणीवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. (Twist in Nagpur Man death while physical relations with Lady)

मयत 26 वर्षीय तरुण इंजिनिअर होता, मात्र सध्या त्याच्यावर बेरोजगारीची वेळ आली होती. कुटुंबीयांच्या संमतीने तरुणाचे लग्न झाले असून त्यांना मुलगा आहे. आरोपी 20 वर्षीय तरुणीसोबत त्याचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी त्याने तरुणीशी कोर्ट मॅरेजही केले होते, मात्र याविषयी कोणालाही माहिती नव्हती.

लॉजमध्ये ‘वेगळं काहीतरी’ करण्याचा प्लॅन

संबंधित युवक-युवतीने गुरुवारी (सात जानेवारी) बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवर गेले. रुम बुक करुन दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दोघांनी दोरीचा उपयोग केला होता.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर (याला पुढील यूट्यूब लिंक हायपरलिंक करा 

तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याभोवतीही आवळली गेली. सेक्सनंतर तरुणी बाथरुममध्ये गेली असताना तरुण खुर्चीसह खाली कोसळला. यामध्ये त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

…तोपर्यंत तरुणाचा मृत्यू

तरुणी बाथरुमबाहेर आली, तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्राथमिक तपास करत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या मुलाची हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना

खुर्चीत बसून शारीरिक संबंधावेळी तरुणाला गळफास, नागपुरात तरुणीला अटक

(Twist in Nagpur Man death while physical relations with Lady)

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...