Jharkhand Murder : चेटकीण असल्याच्या संशयातून वृद्ध महिलेची घरात घुसून हत्या, दोन जण ताब्यात

बुधरामच्या मृत्यूनंतर शिवचरण सोरेन, मंत्री सोरेन, देव सोरेन, पुतीलाल सोरेन आणि साहेब सोरेन यांनी अचानक महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कुदळ मारले. या हल्ल्यात सोना हंसदा यांचा जागीच मृत्यू झाला.

Jharkhand Murder : चेटकीण असल्याच्या संशयातून वृद्ध महिलेची घरात घुसून हत्या, दोन जण ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 8:21 PM

दुमका : चेटकीण असल्याच्या संशया (Suspicious)तून एका 60 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना झारखंडमधील दुमका जिल्ह्यात घडली आहे. ही घटना सरैयाहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेरबानी गावातील आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरुन सरैयाहाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात (Detained) घेतले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. महिलेचा मुलगा सुनील किस्कू याने सांगितले की, गावातील रहिवासी बुधराम सोरेन हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यानंतर त्यांच्या मुलाने 8 जुलै रोजी गावात पंचायत बोलावली होती. पंचांसह सुमारे 15 जण यात सहभागी होते. यामध्ये त्याला आणि त्याची आई सोना हंसदा यांनाही बोलावण्यात आले. पंचायतीमध्ये सर्वांनी आईवर चेटकीण असल्याचा आरोप केला आणि सुधारले नाहीत तर परिणाम वाईट होतील असा इशारा दिला.

हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू

पंचायत संपल्यानंतर सुमारे तासाभरातच बुधराम सोरेन यांचा अचानक मृत्यू झाला. बुधरामच्या मृत्यूनंतर शिवचरण सोरेन, मंत्री सोरेन, देव सोरेन, पुतीलाल सोरेन आणि साहेब सोरेन यांनी अचानक महिलेच्या घरात घुसून तिच्यावर कुदळ मारले. या हल्ल्यात सोना हंसदा यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच सरैयाहाट पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुज यादव पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या संदर्भात सरैयाहाट पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुज यादव यांनी सांगितले की, पोलीस सर्व मुद्यांवर संशोधन करत आहेत. खबरदारी म्हणून वृद्ध महिलेसह बुधरामच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टमही करण्यात आले आहे. जेणेकरून तिच्या मृत्यूचे कारणही समोर येऊ शकेल. त्यांनी सांगितले की, दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल. (Two arrested for elderly womans murder on suspicion of being a witch in jharkhand)

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.