Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवासी बनून रिक्षात बसले, मग गुंगीचे औषध देऊन चालकाला लुटले, काय आहे मोड ऑपरेंडी?

हल्ली चोरटे लुटण्यासाठी काय शक्कल लढवतील सांगू शकत नाही. डोंबिवलीत उघडकीस आलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

प्रवासी बनून रिक्षात बसले, मग गुंगीचे औषध देऊन चालकाला लुटले, काय आहे मोड ऑपरेंडी?
गुंगीचे औषध देऊन रिक्षाचालकाची लूटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 3:26 PM

डोंबिवली : रिक्षाचालकाला गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. प्रवाशी बनून रिक्षात बसले. मग प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून रिक्षा चालकाला लुटले. दोन आरोपींना विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सागर पारेख आणि संपतराज जैन अशी या दोन्ही आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा सव्वा दोन लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. या दोघांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध घालून लुटले

डोंबिवली पश्चिम गरीबाचा वाडा परिसरात राहणारे राकेश म्हामुणकर हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राकेश डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा स्टँडवर रिक्षा घेवून रांगेत असताना दोन जण आले. त्यांनी बिर्ला मंदिर येथे जायचे असल्याचे सांगितले. राकेश यांनी दोघांना रिक्षात बसवले. बिर्ला मंदिर येथे दर्शन घेवून हे दोघे पुन्हा रिक्षात बसले. मग आरोपींनी राकेश यांना गुंगीचे औषध टाकलेला पेढा प्रसाद असल्याचे सांगत खाण्यास दिला. पेढा खाल्ल्यानंतर राकेश बेशुद्ध झाले. यानंतर हे दोघे राकेशची सोन्याची चैन आणि मोबाईल घेवून पसार झाले.

या प्रकरणी राकेश याने डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या दोन भामट्यांचा शोध सुरू केला. सीसीटिव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींची ओळख पटवून या दोघांना विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्यांचा लुटीचा फंडा पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

हे सुद्धा वाचा

मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.