मुंबई-नाशिक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 24 तासांत 5 ठार, दोन दुचाकीच्या टक्करमध्ये आज एक जण गतप्राण

मुंबई-नाशिक महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून, अवघ्या चोवीस तासांत 5 जण ठार झाले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 24 तासांत 5 ठार, दोन दुचाकीच्या टक्करमध्ये आज एक जण गतप्राण
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 10:38 AM

नाशिकः मुंबई-नाशिक महामार्गावर दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण टकरीत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अवघ्या चोवीस तासांत या मार्गावर 5 जण ठार झाले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. काल सोमवारी चौफुली घाटात एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलवर जाणाऱ्यांना मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात 4 जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंढेगाव येथील तुषार हटी कडू या अवघ्या 24 वर्षीय तरुणासह पायल ज्ञानेश्वर गतीर (वय 11), विशाखा ज्ञानेश्वर गतीर (वय 8 रा, मुंढेगाव), ईश्वरी हिरामण डावखर (वय 10, रा. गिरणारे, ता. इगतपुरी) या तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला. साधारणतः दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहनचालक फरार झाला आहे. त्यानंतर लगेचच काही तासांच्या आत हा दुसरा अपघात मुंबई – नाशिक महामार्गावर कळमगाव येथे हॉटेल मिडवेसमोर घडला. या घटनेत दोन दुचाकींची भीषण टक्कर झाली. त्यात भातसानगर येथील रहिवासी रमेश दाभाडे यांचा मृत्यू झाला. दाभाडे हे शहापूरकडून आपल्या घरी भातसानगरला जात होते. त्यांच्या दुचाकीची शहापूरकडे येणाऱ्या दुचाकीशी टक्कर झाली. धडक देणारा दुचाकीस्वार ही गंभीर जखमी असून, तो टेंभा – वैतरणा येथील रहिवासी असल्याचे समजते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी परिसरातील पारदेवीजवळ बाईक आणि क्रेटा कार यांचा भीषण अपघात झाला. कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बाईकसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला. हा अपघात इतका भीषण होता, की अपघातात नाशकातील डाक बंगला परिसरात राहणाऱ्या करण मनोहर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडी पेटवून दिली. या आगीत गाडी जळून खाक झाली आहे. (Two bike accident on Mumbai-Nashik highway, one killed, 5 killed in last 24 hours)

इतर बातम्याः

Special Report: स्वातंत्र्याचं बेफाम वारं, अनंतराव नावाचा झंझावात अन् महाराष्ट्रातलं ‘मॅन्चेस्टर गार्डियन’

निकाळजे म्हणतात, आमदारांवर गुन्हा दाखल करा; भुजबळ-कांदे वादाला नवे वळण

गोदाकाठी माय मराठी…साहित्य संमेलन गीताचे नाशिकमध्ये अनावरण

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.