Nagpur Murder : नागपूरमध्ये वेना नदीत दोन मृतदेह आढळले ! दोघांचेही हातपाय बांधून हत्या

शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवले. दोन्ही मृतदेह अंदाजे 25 ते 30 वयोगटातील व्यक्तींचे असून त्यांचे हातपाय बांधलेले होते.

Nagpur Murder : नागपूरमध्ये वेना नदीत दोन मृतदेह आढळले ! दोघांचेही हातपाय बांधून हत्या
दिल्लीत पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 11:22 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी पोलीस स्टेशन हद्दीतील रुई खैरी शिवारातील वेना नदी (Vena River)त आज दोन मृतदेह (Deadbody) आढळून आले आहेत. एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आहे. या दोघांचेही हातपाय नायलॉन दोरीने बांधून ठेवले होते. त्यामुळे ही हत्या (Murder) असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. बुट्टीबोरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच मृतांची ओळख पटवण्यासाठीही पोलीस प्रयत्न करत आहेत.

पोलिसांकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरु

रुई खैरी शिवारात वेना नदीपात्रात दोन मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यानंतर नागरिकांनी बुट्टीबोरी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवले. दोन्ही मृतदेह अंदाजे 25 ते 30 वयोगटातील व्यक्तींचे असून त्यांचे हातपाय बांधलेले होते. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणं सुरू केले आहे.

वसईत पुराच्या पाण्याने वाहून आलेला मृतदेह आढळला

वसईत पुराच्या पाण्याने वाहून आलेला एका 17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. राहुल नंदलाल विश्वकर्मा (17) असे मयत मुलाचे नाव आहे. मयत मुलगा हा वसईच्या गावराई पाडा येथील रहिवासी आहे. सोमवारी हा तरुण वसईच्या वालीव भागातील कंपनीत कामाला गेला होता. सायंकाळी 7 वाजता तो कंपनीतून बाहेर पडल्यानंतर तो घरी पोहचण्याऐवजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर थेट बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास वसईच्या मधुबन परिसरातील लोखंडी ब्रिजजवळ नाल्यात वाहत आलेला त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला. वालीव पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. हा मृतदेह पुराच्या पाण्यात वाहत आला असल्याचा प्राथमिक अंदाज ही पोलिसांनी वर्तविला आहे. (Two bodies were found in Vena river in Nagpur, Both are suspected of murder)

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...